आबिटकर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आबिटकर बातमी
आबिटकर बातमी

आबिटकर बातमी

sakal_logo
By

दरवर्षीची उत्पन्न
दाखल्याची अट रद्द करा
आमदार आबिटकर ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
............
कोल्हापूर, ता. ८ ः संजय गांधी निराधार योजनेसह शासनाच्या विविध योजनांसाठी दरवर्षी द्याव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करावी, या मागणीचे निवेदन आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
राज्यातील निराधार, अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने राज्याच्या विविध योजना आहेत. योजनेतील लाभार्थ्यांना १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत संबंधितांना हयातीचा व एप्रिल ते जून या कालावधीत उत्पान्नाचा दाखला घेणे सक्तीचे आहे. दाखला न दिलेल्या लाभार्थ्यांचे जुलैपासून अर्थसाहाय्य बंद करण्याचे आदेश आहेत. विशेष साहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची अट रद्द करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत दरवर्षी तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार कार्यालयामध्ये धावपळ करावी लागते. यामुळे या सर्व लाभार्थ्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. तसेच त्यानंतर तीन-चार महिन्यांनंतर पूर्ववत पेन्शन सुरू होते. त्यामुळे लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देणे शक्य होत नाही. या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांना तत्काळ कार्यवाही करून प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्याचे श्री. आबिटकर यांनी सांगितले.
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94530 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..