बाजार समिती निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती निवडणूक
बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

sakal_logo
By

काँग्रेस, राष्‍ट्रवादीला धक्का देणार का
बाजार समिती निवडणूक; शिवसेना, भाजपसह अन्य पक्षांकडून लक्ष घालण्याची गरज

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच बाजार समितीची निवडणूक होत आहे. यामुळे उत्सुकता वाढीस लागली आहे. ग्रामपंचायती व सेवा संस्थांचे पदाधिकारी मतदार आहेत. ग्रामपंचायती व सेवा संस्थांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव आहेत. याच पक्षाच्या नेत्यांनी पाच वर्षांत बाजार समितीवर हक्क गाजवणारे प्रतिनिधी नियुक्त केले. त्यांच्या काळात गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. तोच कित्ता गिरवला जाऊ नये, यासाठी विरोधकांकडून तोडीस तोड उमेदवार देण्याची गरज आहे. त्यासाठी भाजप, शिवसेनेसह अन्य पक्षांनीही लक्ष घालण्याची गरज आहे.
बाजार समितीवर २०१७ ला काँग्रेस, राष्‍ट्रवादी, भाजप, शेकापचे प्रतिनिधी संचालक होते. या काळातच नोकर भरती, गाळे बांधकाम, कमी भाडेपट्टीवर जागा देणे, वारेमाप खर्च करणे आदी गैरव्यवहार झाले. या विरोधात तिघा संचालकांनी आवाज उठविला. संचालक मंडळाने ऑॅगस्ट २०२० ला राजीनामे दिले. त्यानंतर प्रशासक मंडळ आले. माजी आमदार के. पी. पाटील मंडळाचे अध्यक्ष होते. त्याची मुदत सहा महिन्यांपूर्वी संपली. सुरुवातीला के. पीं.च्या काळात कागल येथे जनावरांचा उपबाजार सुरू झाला. कालांतराने राष्‍ट्रवादीच्या एका सदस्याने बाजार समितीचा कारभार चालवण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार हसन मुश्रीफ यांचा हा जवळचा कार्यकर्ता आहे. त्याने मनमानी सुरू केल्याच्या तक्रारी झाल्या.
तूर्त बाजार समिती सचिवांच्या अखत्यातरीत आहे. राज्यात शिंदे गट व भाजपची सत्ता आहे. भाजपचे तीन प्रतिनिधी यापूर्वीच्या संचालक मंडळात होते. त्यांनीच गैरकारभाराला वाचा फोडली. सेनेला फारसे स्‍थान मिळाले नाही. तर शेकापचे संचालक असले तरी प्रभाव फारसा दिसला नाही. त्यामुळे राष्‍ट्रवादीच्या आशीर्वादावर कारभार चालला. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याशी बहुतांशी वेळा सल्ला मसलत करून काही संचालक मंडळ बाजार समितीत प्रभाव टाकत होते.


विरोधक सक्षम हवेत
गैरकारभार सुरू असताना जिल्हा नेते गप्प होते. संचालक मंडळ चौकशीत दोषी आढळले. तरीही पक्षीय पातळीवर कोणावर कारवाई झाली नाही. काही माजी संचालकांनी स्वतः किंवा जवळच्या व्यक्तीला उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. पुन्हा काँग्रेस किंवा राष्‍ट्रवादीचा प्रभाव असू शकतो मात्र पारदर्शी कारभारासाठी भाजप, सेनेसह अन्य पक्षांनीही अभ्यासू उमेदवार दिले तरच कारभार सक्षम होण्यास मदत होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94537 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..