मनवाड सोसायटी सचिवांच्या कारभाराची चौकशीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनवाड सोसायटी सचिवांच्या कारभाराची चौकशीची मागणी
मनवाड सोसायटी सचिवांच्या कारभाराची चौकशीची मागणी

मनवाड सोसायटी सचिवांच्या कारभाराची चौकशीची मागणी

sakal_logo
By

49006
गडहिंग्लज : मनवाड सोसायटी सचिव कारभाराविरोधात अमित गराडे यांना निवेदन देताना सभासदांचे शिष्टमंडळ.

मनवाड सोसायटी सचिवांच्या
कारभाराची चौकशीची मागणी
गडहिंग्लज, ता. १३ : मनवाड (ता. गडहिंग्लज) येथील मनवाड विकास सेवा संस्थेचे सचिव रमेश कलगोंडा यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी सभासदांनी केली आहे. याबाबत सहायक निबंधक अमित गराडे यांना निवेदन दिले.
ेत्यात म्हटले आहे की, सचिव कलगोंडा संस्थेचा एकहाती कारभार करीत आहेत. संचालकांच्या मर्जीतील सभासदांच्या सह्या घेऊन वार्षिक सभा झाल्याचे कागदोपत्री दाखविली जाते. ऑडिटसंदर्भातील दोष दुरुस्ती अहवालही सादर केलेला नाही. रहिवासी पुरावा किंवा सातबारा उतारा न घेता काहींना सभासदात्व दिले आहे. शेअर भागावर सभासदांना व्याज किंवा लाभांश मिळत नाही. कर्जमाफी योजनेची माहितीही कोणाला दिलेली नाही. कर्ज वितरणही सदोष असल्याचा आरोप आहे. ऑडिट रिपोर्टप्रमाणे फरक रकमेची वसुली सचिव व संचालकांकडून करण्यात यावी. अंतर्गत हिशेब तपासणी झाली नसतानाही त्याचा खर्च सचिवांनी दाखवला आहे. सभासदांनी मागणी केलेली कागदपत्रे देण्यास सचिव टाळाटाळ करतात. सचिव यांच्यामागे राजकीय वरदहस्त असल्याने आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. सचिवांचा कारभार संशयास्पद असून, त्यांची बदली व त्यांच्या कारभाराची चौकशी करावी. पांडुरंग लोखंडे, धनाजी पाटील, भरमू आसवले, सोनाबाई आसवले, केदारी आसवले, बसवंत आसवले, शिवदास आसवले, भीमराव पोरीवाडे, नागाप्पा लोखंडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
--------------
कोट
सातबारा घेतल्याशिवाय कोणालाही कर्ज दिलेले नाही. संस्थेच्या ताळेबंदासह इतर कारभार पारदर्शक आहे. आता तक्रार करणाऱ्यांपैकीच काही जण पूर्वी संचालक असताना नवी सभासद नोंदणी झाली आहे. त्याचवेळी त्यांनी आक्षेप का घेतला नाही, हा प्रश्‍न आहे. अंतर्गत हिशेब तपासणीच झाली नसल्याने खर्च उचलण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत.
- रमेश कलगोंडा, सचिव

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94548 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..