प्रथम येणाऱ्यास मिरवणुकीत प्रवेश मिरवणुकीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथम येणाऱ्यास मिरवणुकीत प्रवेश
मिरवणुकीत प्रवेश
प्रथम येणाऱ्यास मिरवणुकीत प्रवेश मिरवणुकीत प्रवेश

प्रथम येणाऱ्यास मिरवणुकीत प्रवेश मिरवणुकीत प्रवेश

sakal_logo
By

प्रथम येणाऱ्यास मिरवणुकीत प्रवेश
---
ताराबाई रोडसाठीच ड्रॉ; सात मंडळांचा प्रवेशक्रम निश्चित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः संपूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठी ड्रॉ काढण्यात येणार नाही. मंडळांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे फक्त ताराबाई रोडवरील सात मंडळांचाच ड्रॉ काढण्यात आला आहे. अन्य मार्गावर जे मंडळ प्रथम येईल, त्याला प्राधान्याने मिरवणुकीत प्रवेश दिला जाईल, असे शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आज स्पष्ट केले. मंडळांनी ध्वनिमर्यादेसह वेळेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा पारंपरिक मार्गाबरोबर दोन समांतर मार्ग केले आहेत. या मार्गाचा अनेक मंडळे अवलंब करणार आहेत. पारंपरिक मार्गावर मंडळांना कसा प्रवेश मिळणार, याची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. मात्र, जे मंडळ प्रथम येईल, त्यास मिरवणुकीत प्रवेश दिला जाईल, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी येथून रोटेशन पद्धतीने संख्या पाहून मंडळे पुढे सोडण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पोलिस प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत ताराबाई रोडवरून येणारी मंडळे मोजकीच असतात. तेथे ड्रॉ काढा, अशी मागणी पुढे आली होती. त्यानुसार सात मंडळांचा ‘ड्रॉ’ काढून क्रम निश्चित करण्यात आला आहे. मिरवणुकीत सर्व मंडळांनी ध्वनिमर्यादेचे आणि रात्री बारापर्यंतच्या वेळेचे पालन करावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

ताराबाई रोडवरून येणाऱ्यांचा क्रम
१) हिंदवी
२) शिवाजी तालीम
३) यूके बॉईज
४) वाघाची तालीम
५) रंकाळा वेस
६) रंकाळा तालीम
७) दयावान

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94561 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..