कोलोली केंद्रशाळेत पाद्यपुजन व सत्कार समारंभ. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलोली केंद्रशाळेत पाद्यपुजन व सत्कार समारंभ.
कोलोली केंद्रशाळेत पाद्यपुजन व सत्कार समारंभ.

कोलोली केंद्रशाळेत पाद्यपुजन व सत्कार समारंभ.

sakal_logo
By

३२१६
कोलोली केंद्रशाळेत पाद्यपूजन सोहळा
पुनाळ : कोलोली (ता. पन्हाळा) येथील केंद्रशाळेत आदर्शवत गुरुवर्यांचा पाद्यपूजन व गुरुजनांचा सत्कार समारंभ झाला. अध्यक्षस्थानी विजय पाटील होते. प्रभारी मुख्याध्यापक अनिल आंगठेकर यांनी स्वागत केले. सुरुवात पाद्यपूजा करून झाली. शाळेच्या विकासात बहुमोल योगदान देणाऱ्या गुरुजनांचा सत्कार केला. ही शाळा गुणवंत व प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची खाण असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविता आले, असे मत श्री. गावडे व कणसे यांनी व्यक्त केले. उपसरपंच श्री.तांबवेकर यांनी दोन्ही शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. अध्यापिका अरुणा वसावे यांची कन्या डॉ. स्नेहल यांचाही सत्कार केला. नियोजन संतोष जायभाय, अरुणा वसावे, स्नेहल घाटगे, प्रीतम पाटील, मनिषा पाटील व शाळा व्यवस्थापन समितीने केले. केंद्रप्रमुख एस.पी चौगुले, उपसरपंच पंडीत तांबवेकर, मुख्याध्यापक एल. बी. पोवार, विजया जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर बचाटे, उपाध्यक्ष संदीप पाटील, सदस्य तात्यासो परीट, संजय सुतार, सदस्या सविता माने, शिल्पा कांबळे, कोमल गुरव, जयसिंग गुरव, तानाजी पाटील व बा. म. कांबळे उपस्थित होते.

01812
शहीद पब्लिक स्कूलमध्ये व्याख्यान
राशिवडे बुद्रुक : जीवन अनमोल आहे आणि त्यामध्ये निसर्गाला मोल आहे. याची जाणीव ठेवून सभोवतीच्या प्रकृतीचा आदर करावा, असे प्रतिपादन राहुल भागवत व निशा भागवत या दाम्पत्याने केले. तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशातील संस्कृती, निसर्ग अभ्यासण्यासाठी बाहेर पडलेल्या भागवत दाम्पत्यांचे येथील शहीद संकुलच्या वतीने प्रा. सुनील पाटील यांनी स्वागत केले. श्री. भागवत यांनी निसर्ग आणि प्रदूषण याबाबत विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण माहिती दिली. माणूस आपल्या अट्टहासासाठी भौतिक बदल करू पाहतो आहे. सभोवतालच्या निसर्गाचा अभ्यास जरी केला तरी चांगला उद्योग मिळू शकतो, असेही ते म्हणाले. प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. जी. कुलकर्णी'' प्रा. आर. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सागर शेटगे यांनी आभार मानले.

02200
कोडोलीत रक्ततपासणी शिबिर
बोरपाडळे : कोडोली (ता. पन्हाळा) येथील स्वामी समर्थ पॅरामेडिकल कॉलेज व छावा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे रक्तदान व मोफत रक्ततपासणी शिबिर घेतले. 27 जणांनी रक्तदान केले. जीवनधारा ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. ३० जणांची रक्त तपासणीमध्ये केली. स्वामी समर्थ पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉ. संतोष सुतार, डॉ.साक्षी सुतार तसेच सांस्कृतिक मंडळाचे सुजित पाटील, दीपक जाधव, रणजित पाटील, प्रकाश कापरे आदींची उपस्थिती होती.

यवलूजच्या राधाकृष्ण संस्थेची सभा
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा)येथील श्री राधाकृष्ण दूध संस्था व कृषिपूरक सेवा संस्थेची वार्षिक सभा राधाकृष्ण मंदिर येथे झाली. अध्यक्षस्थानी सुभाष दाभोळकर होते. जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांचा संस्थेमार्फत सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार केला. सचिवदत्तात्रय पाटील यांनी अहवाल वाचन केले. सभासदांना 10 टक्के लाभांश व 12 टक्के दीपावली ठेव, दीपावली भेट वाटप करणेत येणार आहे. संस्थेचे मार्गदर्शक श्रीकांत हिरवे यांनी संचालक मंडळाने सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्वच विभाग उत्तम सुरू असल्याची माहिती दिली. उपाध्यक्ष रंगराव कोले, संचालक तानाजी पाटील, तानाजी भोसले, पांडुरंग काशिद, मारुती गवळी, हिंदुराव धनगर, दगडू कोले, गणपती जाधव, शारदा देसाई, अनंत जडे, सदाशिव आडनाईक व सुकाणू समिती, रंगराव पाटील, मधुकर हिरवे, शामराव दाभोळकर आदी उपस्थित होते.


00579
महादेव दूध संस्थेची वार्षिक सभा
असळज ः महादेव दूध संस्थेने सभासदभिमुख, पारदर्शक व काटकरीचा कारभार केल्याने आदर्श संस्था म्हणून नावारुपास आल्याचे प्रतिपादन अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी केले. धुंदवडे (ता.गगनबावडा) येथील महादेव सहकार समूह दूध संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. शिक्षक बँकेचे संचालक गजानन कांबळे प्रमुख पाहुणे होते. संस्थेस 3 लाख 14 हजार नफा झाला आहे. सभासदांच्या मृत जनावरांसाठी म्हणून 5 हजारांची मदत सभासद महादेव मारुती पाटील यांना दिली. समूहाच्या वतीने दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गजानन कांबळे व धुंदवडे शाळेचे २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेबद्दल विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक संभाजी पाटील यांचा सत्कार केला. अहवाल वाचन सचिव तानाजी मोहिते यांनी केले तर दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.

२९५७
राधानगरी अर्बनतर्फे नरतवडेत वृक्षारोपण
सोळांकूर ः राधानगरी अर्बन फौंडेशनची सुरुवात बँकिंग क्षेत्रातून झाली असली तरी अल्पावधीतच शिक्षण, आरोग्य व पर्यावरणीय क्षेत्रात भरीव काम करुन सामाजिक बांधिलकी जपली असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी पाटील यांनी केले. नरतवडे (ता. राधानगरी) येथील गायरानात फौंडेशन व साईसमृद्धी मल्टीपर्पज हॉलच्या वतीने वृक्षारोपणप्रसंगी तो बोलत होते. अध्यक्षस्थानी फौंडेशनचे अध्यक्ष उत्तम जाधव तर प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच श्रद्धा पाटील होत्या. उपसरपंच सहदेव कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी पाचशे झाडांचे रोपण केले. डी. के.चौगले, संदीप मगदूम, बाबूराव गुरव, विलास सावंत, ग्रामसेविका सरिता पाटील, सुरेखा कुंभार, आप्पासो पाटील, निलेश तानवडे,सुरेश जाधव, संतोष जाधव,रणजित जाधव, कृष्णात सुतार, सागर इंगळे, इंद्रजित चौगले, आनंदा कांबळे, रवींद्र जाधव, सागर मगदूम, लोकमान्य ॲकडमीचे स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. बी. एस. बरगे यांनी सूत्रसंचालन केले. अरुणा मगदूम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94563 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..