डोके शांत ठेऊन बंदोबस्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोके शांत ठेऊन बंदोबस्त करा
डोके शांत ठेऊन बंदोबस्त करा

डोके शांत ठेऊन बंदोबस्त करा

sakal_logo
By

49020
490१८

डोके शांत ठेवून बंदोबस्त करा
पोलिस अधीक्षक बलकवडे; एअर प्लग, मास्क, ड्रायफ्रूटचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त अत्यंत सयंमाने आणि डोक शांत ठेवून करा. दिलेले पॉईंट मिरवणूक संपेपर्यंत सोडू नका अशा सूचना पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. पोलिस ग्राउंडवर विसर्जन बंदोबस्त वाटप प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी पोलिसांना एअर प्लग, मास्क, चिक्की, ड्रायफ्रूटचे वाटपही करण्यात आले.
अधीक्षक बलकवडे म्हणाले, ‘‘तीन वर्षानंतर गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते आहे. त्यासाठी गेली आठ दिवस पोलिस बंदोबस्त बजावत आहेत. विसर्जन मिरवणुकीसह मोठी गर्दी होणार आहे. त्यासाठी बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन केले आहे. बंदोबस्त संयमाने आणि डोके शांत ठेवून करा, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपणाला हातवारे करण्याची सवय असते. जर काठी हातात असेल तर गैरसमज होण्याचे धोके असतात. त्यासाठी डाव्या हातात काठी राहील, याची काळजी घ्या. मिरवणुकीत कोणत्याही अफवा पसरल्या जाणार नाहीत. याची काळजी घ्या. आपण आपल्या नेमून दिलेल्या पॉईंटवरच राहा. परस्पर कोणतीही कारवाई करू नका. त्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या. मिरवणुकीत वाद्ये आणि सिस्टीमच्या सान्निध्यात तासन्‌तास बंदोबस्त बजावा लागतो. त्यामुळे कानात ‘एअर प्लग’ घाला. मास्कचा वापर करा.

कुटुंबीयांकडे कंट्रोलचा नंबर
घरात काही अत्यावश्यक बाब घडली असेल तर नातेवाईक तुमच्याशी संपर्क करतात. मात्र मिरवणुकीतील आवाजामुळे तुम्हाला त्यांचे फोन घेता येत नाहीत अथवा ऐकू येत नाहीत. त्यासाठी घरच्यांना कंट्रोलचाही नंबर द्या. त्याद्वारे तुम्हाला त्यांचा वायरलेसवरून निरोप पोहचवला जाईल आणि आवश्यक ती मदत व सहकार्य केले जाईल, असे बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94639 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..