आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान प्राप्‍त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान प्राप्‍त
आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान प्राप्‍त

आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान प्राप्‍त

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान प्राप्‍त
१२१ जोडप्यांना होणार लाभ; अनुदानाची रक्‍कम होणार थेट खात्यावर जमा
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ९ : जिल्‍हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाहासाठी अनुदान देण्यात येते, मात्र मागील दोन वर्षांत यासाठी अनुदानच प्राप्‍त झाले नाही. सततच्या पाठपुराव्यानंतर केंद्र व राज्य शासनाने हे अनुदान उपलब्‍ध करून दिले आहे. केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी ३० लाखप्रमाणे ६० लाख रुपये उपलब्‍ध करून दिले आहेत. या रकमेचे प्रती लाभार्थी ५० हजार रुपयांप्रमाणे अनुदान थेट खात्यावर जमा केले जाणार आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थीला प्रती व्यक्‍ती ५० हजार रुपये अनुदान दिले जाते; मात्र दोन वर्षांत अनुदानाची रक्‍कमच उपलब्‍ध झाली नाही. विभागाकडे मार्च २०१९ मध्ये अनुदानाची रक्‍कम आली होती. त्यांनतर आता ही रक्‍कम उपलब्‍ध झाली आहे. या र‍कमेतून सर्वच लाभार्थींना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्‍प्यात १२१ लाभार्थींना अनुदानाचे वाटप होणार आहे, तर प्रतीक्षा यादीत असलेल्या १८४ लाभार्थींना अनुदानासाठी आणखी काही काळ वाट पाहावे लागणार आहे.

दृष्टिक्षेपात

केंद्राकडून प्राप्‍त अनुदान ३० लाख
राज्याकडून आलेले अनुदान ३० लाख
एकूण आलेले अर्ज ३०४
लाभार्थी निवड संख्या १२१
प्रतीक्षेतील लाभार्थी १८४
प्रती लाभार्थी ५० हजार अनुदान
लाभार्थी खात्यावर थेट अनुदान होणार जमा

दोन वर्षांनी आतंरजातीय विवाहाचे अनुदान आले आहे. तत्पूर्वी आलेल्या अनुदानातून अर्जांची निर्गत केली आहे. आता ३०४ लाभार्थींनी अर्ज केले आहेत. यातील केवळ १२१ लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. उर्वरित लाभार्थींसाठी अनुदानाची मागणी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात संबंधित लाभार्थींच्या खात्यावर अनुदानाची रक्‍कम जमा केली जाणार आहे.
- दीपक घाटे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94642 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..