भाकप निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाकप निवड
भाकप निवड

भाकप निवड

sakal_logo
By

४९०५६

भाकप जिल्हा सचिवपदी
सतिश्‍चंद कांबळेंची फेरनिवड
सूर्यवंशी, फोंडे, लोहार यांची सहसचिवपदी नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. ८ ः जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षात सतीशचंद्र कांबळे यांची जिल्हा सचिव पदी फेरनिवड तर दिनकर सूर्यवंशी (करवीर तालुका), गिरीश फोंडे (हातकणंगले तालुका) आणि महेश लोहार (इचलकरंजी) यांची सहसचिवपदी निवड झाली. अनिल चव्हाण यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव सुभाष लांडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रीया झाली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय अधिवेशन विजयवाडा येथे तर राज्य अधिवेशन १८ ते २० सप्टेंबरला अमरावतीत होत आहे. त्यात राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी होतील. तत्पूर्वी पक्षाचे ६३ जिल्हा कौन्सिल सदस्य व २१ जणांची कार्यकारीणी निश्चित झाली.
श्री. लांडे म्हणाले की, ‘‘ कोल्हापूर जिल्ह्याला शाहू महाराजांच्या विचारांची तसेच पुरोगामीत्वाची परंपरा आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांनी पुरोगामी विचारांच्या आधारे येथे अनेक लढे उभारले. देशात व राज्यात सनातनी व प्रतिगामी विचारांचे सरकार सत्तेत आहेत. त्याचेच आपल्या समोरील कडवे आव्हान आहे, याची जाणीव ठेवून कार्य करत राहिले पाहिजे.’’
यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या उमा पानसरे, बी. एल. बर्गे, सुशीला यादव, सुमन पाटील, बाळू पाटील, आशा बर्गे, सुमन गावडे यांची कायम निमंत्रित म्हणून निवड झाली. ज्येष्ठ सदस्य दिलीप पवार यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. शाहीर सदाशिव निकम, वाय. एन. पाटील, नामदेव पाटील, बाळासाहेब पाटील, ॲड. अमर नाईक, ॲड. अमृता मोरे, स्नेहल कांबळे, सावित्री शिंदे, सुनिता अमृतसागर, स्वाती क्षीरसागर, हनुमंत लोहार, दिलदार मुजावर, रमेश वडणगेकर, उमेश पानसरे, विक्रम कदम, शिवाजी माळी, प्रशांत आंबी, भारती चव्हाण, आरती रेडेकर, वर्षा लवटे, सुनंदा खाडे, पद्मजा माने, रेखा पाटील आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविणार
कोल्हापूरात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणूका भारतीय कम्युनिस्ट पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढवेल. तत्पूर्वी कोल्हापुरातील पक्षाच्या शाखा व सभासद संख्या आणि कार्यकर्ते वाढविण्यावर भर असणार आहे.’’ असे यावेळी सतिशचंद्र श्री कांबळे यांनी यावेळी जाहिर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94643 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..