पर्यावरणपूरकच वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरकच वाटचाल
पर्यावरणपूरकच वाटचाल

पर्यावरणपूरकच वाटचाल

sakal_logo
By

49165
पंचगंगेत एकाही मूर्तीचे विसर्जन नाही
पर्यावरणपूरकचा आदर्श, इराणी खणीत १०८१ मूर्तींचे विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः घरगुती गणेशमूर्तींनंतर सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचेही इराणी खणीतच शंभर टक्के विसर्जन करत पर्यावरणपूरक विसर्जन केल्याचे कोल्हापूरकरांनी दाखवून दिले. पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग बंद केल्याने कार्यकर्त्यांनी नदीतच मूर्ती विसर्जनाचा अट्टाहास केला नाही, की रात्री बारानंतर पोलिसांनी साउंड सिस्टीम बंद केल्यानंतर खळखळ केली नाही. विविध ठिकाणी महापालिकेने ठेवलेल्या २५ कुंडांत १२७३ घरगुती; तर १६१ मंडळांच्या मूर्ती विसर्जित केल्या. यातून कोल्हापूरने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श पॅटर्न राज्यासमोर ठेवला आहे.
घरगुती गणपती पर्यावरणपूरक विसर्जित करण्यासाठी कोल्हापुरात चळवळ सुरू झाली. पाहता-पाहता ती चळवळ प्रत्येक कोल्हापूरवासीय पुढे नेण्यासाठी कटिबद्ध झाला आहे. पंचगंगा नदी, तलावांचे प्रदूषण होऊ नये यासाठी निर्माल्यही स्वतंत्र विसर्जित केले जात आहे. त्यानंतर यंदा सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी गंगावेशेतून नदीकडे जाणारा पारंपरिक मार्ग बंद करण्याचा प्रयोग केला. त्याला काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो मार्ग खुला केला नाही. तसेच घाट परिसर बॅरिकेडस लावून बंद केला. मिरवणूक सुरू झाल्यानंतर पर्यायी मार्गाने आलेल्या मूर्ती गंगावेशकडून इराणी खाणीकडे वळवल्या. सायंकाळनंतर मुख्य मिरवणूक मार्गावरून येणारी मोठ्या मंडळांनीही त्या मार्गाला आक्षेप घेतला नाही. त्यामुळे इराणी खणीवर विसर्जित झालेल्या मूर्तींची संख्या १०८१ झाली. त्यात कसबा बावडा येथील राजाराम बंधारा घाटावर मूर्ती विसर्जित करू न दिलेल्या; तसेच २५ कुंडांच्या ठिकाणी मंडळांनी विसर्जित केलेल्या १६१ मूर्ती आहेत. तसेच चार विभागीय कार्यालयाच्या क्षेत्रात ठेवलेल्या २५ कुंडांत १२७३ घरगुती गणेश विसर्जन केले. खणीवर मंडळांनी निर्माल्य विसर्जित न करता ते महापालिकेकडे जमा केले.
याबरोबरच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी रात्री बारानंतर पोलिसांनी सिस्टीम बंद केल्या. यापूर्वीचा मंडळांचा अनुभव पाहता विरोध होईल, असा अंदाज होता; पण काही ठराविकच मंडळे सोडली तर कुणीही या निर्णयाला विरोध केला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94775 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..