मी पुन्हा येईन.. : मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी पुन्हा येईन.. : मुश्रीफ
मी पुन्हा येईन.. : मुश्रीफ

मी पुन्हा येईन.. : मुश्रीफ

sakal_logo
By

49140
मुत्नाळ : हिरण्यकेशी व आर्यन ग्रुपच्या कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ. शेजारी शिवलिंगेश्वर महास्वामी, अभिनव मंजुनाथ स्वामी, उदय जोशी व इतर.

मी पुन्हा येईन... : मुश्रीफ
---
मुत्नाळला गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी मी नेहमी जगद्‍गुरू श्री पंचम शिवलिंगेश्‍वर महास्वामींचे दर्शन घेतो. त्यानंतर निवडणुकीत निवडून येतो व मंत्रीही होतो. गेल्या वेळची निवडणूकही त्याला अपवाद राहिली नाही. सध्या आमची सत्ता गेली असली, तरी आता मुत्नाळ येथे महास्वामींचे दर्शन घेतल्याने लवकरच शुभसंकेत मिळणार असून, मी पुन्हा येईन, अशी माझी खात्री आहे, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
मुत्नाळ येथील हिरण्यकेशी व आर्यन ग्रुपतर्फे आयोजित गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. निडसोशीचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामी व क्यारगुडचे श्री अभिनव मंजुनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘जनतेच्या पाठबळावर मी कागल मतदारसंघातून निवडून येतो. मंत्रिपदाचीही संधी मिळाली. या कालावधीत अनेक निर्णय घेऊन राज्यातील विविध घटकांना न्याय देण्यात यश आले. मुत्नाळच्या विकासासाठी निश्चित निधी उपलब्ध करून देऊ. रस्त्यालगतच्या जाधव यांच्या विहिरीला संरक्षक कठडा उभारण्यासाठीही पाठपुरावा करू. कोरोना महामारी नसल्याने यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला आहे. मुत्नाळच्या मंडळाचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत.’’ दरम्यान, आमदार मुश्रीफ, शिवलिंगेश्‍वर स्वामी, श्री अभिनव स्वामी यांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. श्री शिवलिंगेश्वर व मंजुनाथ महास्वामीजींचे या वेळी आशीर्वचन झाले. उपसरपंच अक्षय पाटील यांनी स्वागत केले. आय. पी. चिनगी यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब मुरगी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सतीश पाटील-गिजवणेकर, राजेंद्र गड्ड्यानावर, उदय जोशी, संतोष पाटील, राकेश पाटील, शिवप्रसाद तेली, अभिजित पाटील, विष्णू केसरकर, परगोंड पाटील, नाना पाटील, रामगोंड ऊर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, राहुल शिरकोळे, रमेश पाटील, अरुण मिरजे, रवी घेजी, किरण शिंदे, शंकर मग्यापगोळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94783 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..