पोलीस-समाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस-समाज
पोलीस-समाज

पोलीस-समाज

sakal_logo
By

पोलिसांची समाजाशी नाळ होतेय धूसर
विसर्जन मिरवणुकीतील वास्तव; कर्तव्य पार पाडताना घनिष्ट मैत्रीचा दिसला अभाव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः ये भावा जरा पुढे घे, मिरवणूक थांबली आहे, असे सांगून मंडळाच्या कार्यकर्त्याला समजावणारा पोलिस आणि ‘साहेब दोनच मिनिटे’ म्हणत जरा थांबवण्याची परवानगी घेणारा आणि नंतर स्वतःहून मिरवणुकीला चालना देणारा कार्यकर्ता. हे चित्र कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीतील काही वर्षांपूर्वीचे चित्र. यातून पोलिस आणि मंडळातील सुसंवाद कसा होता याचे वास्तव समोर येत होते; पण यावेळी समाजाशी किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेल्या कर्मचाऱ्यांचा अभाव पाहायला मिळाला.
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरी करणारी मोठी मंडळे आणि पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांचे अतिशय घनिष्ट संबंध होते. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अशी मंडळे काय करणार याची ‘अप टू डेट’ माहिती काही पोलिसांकडे अगोदरच यायची. त्याची नोंद संबंधित पोलिस ठाण्याला सांगून योग्य त्या खबरदारी घेण्याची सूचना दिल्या जायच्या. यावेळीही हा प्रयत्न झाला, जी काही मोठी मंडळे होती, त्यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नेमले गेले; पण त्याचा प्रत्यक्ष मिरवणुकीत कितपत फायदा झाला हे २७ तास चाललेल्या मिरवणुकीत अपवादानेच दिसला.
मिरवणुकीला गती यावी म्हणून काही वर्षांपूर्वी साध्या वेशातील आणि मूळ कोल्हापूरच्याच पोलिसांना मिरवणुकीत नाचण्याचा प्रयोग राबवला. नाचत, नाचत या पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढे रेटायचे, त्यातून मिरवणुकीला गती देण्याचा प्रयत्न होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘विनालाठी’ बंदोबस्त ही संकल्पनाही राबवली. कोणालाच पुढे जा किंवा मागे राहा म्हणायचे नाही असाही प्रयोग झाला, त्यालाही प्रतिसाद मिळाला. काही पोलिस कर्मचाऱ्यांची नांवे ते निवृत्त झाल्यानंतर अजूनही घेतली जातात त्याचे कारण म्हणजे त्यांची मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत असलेली ‘ॲटॅचमेंट’, त्यातून मिरवणूक असो किंवा फुटबॉल सामान्यावरून झालेला राडा असो त्यावेळी त्याचा फायदा व्हायचा. आता असे कर्मचारी नाहीत असे नाही पण त्यांना अशावेळी मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. हा प्रयोग यापूर्वी झाला, या वेळी तसे झाल्याचे दिसले नाही.

दक्षता समिती अस्तित्‍वहिन
पूर्वी गणेशोत्सव म्हटला की आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी होणाऱ्या बैठकीवर कोल्हापूर जिल्हा दक्षता समितीचे वर्चस्व असायचे. या समितीतील त्यावेळच्या ज्येष्ठ लोकांनाही मंडळांकडून मान मिळायचा. अशा व्यक्तींना पुढे करून मिरवणूक पुढे सरकली जायची त्यालाही यश येत होते. पण अलीकडे ही दक्षता समितीच अस्तित्‍वशून्य झाली आहे. या समितीच्या पुनर्रचनेची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94857 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..