छायाचित्र पहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र पहिले
छायाचित्र पहिले

छायाचित्र पहिले

sakal_logo
By

49273
‘युनेस्को’च्या स्पर्धेत
कोल्हापूरचे छायाचित्र पहिले
.................
कोल्हापूर, ता. १० ः ‘युनेस्को’च्या नवी दिल्ली येथील कार्यालयातर्फे जागतिक साक्षरता दिनानिमित्त (८ सप्टेंबर) राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिजित गुर्जर यांनी काढलेल्या छायाचित्राला पहिला पुरस्कार मिळाला. स्पर्धेत देशभरातील विविध छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. शैक्षणिक परिसर, शैक्षणिक परिसरातील बदल पूर्वी आणि नंतर, अपारंपरिक शैक्षणिक परिसर, अशा तीन विभागांत ही स्पर्धा होती.
स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम आणि तृतीय गटात तृतीय असे दोन पुरस्कार व विशेष उत्तेजनार्थ एक असे तीन पुरस्कार श्री. गुर्जर यांनी पटकाविले. या सर्व पुरस्कारप्राप्त छायाचित्रांचे युनेस्कोच्या दिल्ली कार्यालयात प्रदर्शन आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय विशेषांकामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. श्री. गुर्जर यांनी या स्पर्धेसाठी ऊसतोड मजुरांची मुले प्रतिकूल परिस्थितीतही कशा पद्धतीने अभ्यास करतात याची छायाचित्रे पाठवली होती. हे छायाचित्र २०१८ मध्ये कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या परिसरात टिपले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94873 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..