आजऱ्यात रात्री उशीरापर्यंत मिरवणुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात रात्री उशीरापर्यंत मिरवणुक
आजऱ्यात रात्री उशीरापर्यंत मिरवणुक

आजऱ्यात रात्री उशीरापर्यंत मिरवणुक

sakal_logo
By

आजऱ्यात रात्री उशिरापर्यंत मिरवणूक
आजरा : आजरा तालुक्यात गणेशोत्सव मंडळाची शांततेत व उत्साहात मिरवणूक झाल्या. पारंपरिक वाद्याच्या निनाद व लेझीम पथकाच्या तालात मिरवणुका पार पडल्या. पावसाने उघडीप दिल्याने मिरणुकीत व्यत्यय आला नाही. रात्री उशिरा आजऱ्यात हिरण्यकेशी नदीघाटाव, तर अन्य गावांत तलाव, ओढे व हिरण्यकेशी व चित्रा नदीत विसर्जन झाले. आजरा व उत्तूर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तालुक्यात शंभर गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांचे विसर्जन शांततेत व उत्साहात झाले.
आजरा शहरात दरवर्षीप्रमाणे श्री रवळनाथ मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सातनंतर शहरातील गणपती विसर्जनसाठी रस्त्यावर आले. सुभाष चौक, लिंगायत गल्ली, भाजी मंडई व शिवसेना प्रणित जयशिवराय तरुण मंडळ हे चार सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी निघाले. मिरणुकीत पारंपरिक वाद्याचा भर होता. सुभाष चौक तरुण मंडळाचे हाजगोळी बुद्रुकचे लेझीम पथक, लिंगायत गल्लीत गडहिंग्लज येथील वक्रतुंड ढोल-ताशा पथक, भाजी मंडई गणेशोत्सव मंडळाचे आजऱ्याचे शंभुनाथ ढोल-ताशा पथक व हालगी, शिवसेना प्रणित जयशिवराय तरुण मंडळाचे कलापथक, हलगी वादन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. पेरणोली (ता. आजरा) येथील शिवशक्ती गणेशोत्सव तरुण मंडळाची मिरवणूक उत्साहात व जल्‍लोषात निघाली. सायंकाळी सहा वाजता श्री. रवळनाथ मंदिरातून मिरवणूक निघाली. दहा वाजता येथील तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94887 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..