जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

पहिल्या ज्वेलरी मशिनरी,
प्रदर्शनाचे उद्या उद्‌घाटन

कोल्हापूर, ता. १० ः पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच होणाऱ्या ज्वेलरी मशिनरी व ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १२) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे. महासैनिक दरबार हॉलमध्ये हे प्रदर्शन होईल. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत हे प्रदर्शन खुले असेल. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला पाच जिल्ह्यांतून सराफ व सुवर्णकार व्यावसायिक उपस्थित राहतील. ‘कोल्हापूरचा साज, महाराष्ट्राचा ताज’ अशी या प्रदर्शनाची टॅगलाईन आहे. केएनसी सर्व्हिसेस प्रस्तुत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. कोल्हापूर जिल्हा हा दागिने उत्पादनांचे मोठे केंद्र आहे. या व्यवसायावर साधारण २५ हजार कारागिर अवलंबून आहेत. मात्र आजही बहुंताशी ठिकाणी पारंपरिकतेवरच भर देण्यात येतो. यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या मशिनरींजचे प्रदर्शन यानिमित्ताने भरविण्यात येणार आहे. या वेळी खासदार धनंजय महाडिक, जीजेसी अध्यक्ष आशिष पठे, उपाध्यक्ष सयंम मेहरा, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित राहणार आहेत. मशिनरी स्टॉलसोबत निवडक स्थानिक ज्वेलरी व्यावसायिकांचेही स्टॉल असणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी कोल्हापूरसोबतच सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव व गोवा येथून सराफ व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केएनसी सर्व्हिसेसच्या कांती नागवेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94893 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..