भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळतर्फे आजऱ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळतर्फे
आजऱ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण
भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळतर्फे आजऱ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळतर्फे आजऱ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण

sakal_logo
By

49461
आजरा : येथे भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळातर्फे रुग्णवाहिका प्रदानप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन आबिटकर, शैलेश पाटील, योगेश पाटील, उमेश पारपोलकर मंडळाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर.

भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळतर्फे
आजऱ्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण
आजरा, ता. ११ : येथील भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळ आजरा प्रणित वाघाची तालीम मंडळातर्फे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाला. गेले दोन वर्ष मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नऊ लाख रुपये जमा केले होते. यासाठी डॉ. धीरज नाईक व किशोर भुसारी यांचे सहकार्य लाभले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन आबिटकर, आजरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उद्योजक बाळासाहेब नाईक, किशोर भुसारी, आजरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, योगश पाटील, दयानंद भुसारी, आनंदा फडके, मारुती बिरजे, वाघाची तालीम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पाटील, रमेश बुरुड, संतोष गिरी, उमेश पारपोलकर व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या वेळी मंडळातर्फे घेतलेल्या मोफत आरोग्य शिबीरात हदयरोग, मधुमेह, रक्तदाब तपासण्या झाल्या. तसेच घेवडे हॉस्पिटलतर्फे नेत्रतपासणी करण्यात आली. कोवीड लसीकरण, महिलांसाठी हळदी कुंकू, विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा यासह विविध उपक्रम झाले. मंडळाचे अध्यक्ष महेश पारपोलकर, उपाध्यक्ष मंदार बिरजे, सचिव राहूल नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94909 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..