इचलकरंजी विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे
इचलकरंजी विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे

इचलकरंजी विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे

sakal_logo
By

बाप्पा मोरया...
इचलकरंजी व गडहिंग्लज परिसरात दोन वर्षांच्या कालावधीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीचा अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला. पारंपरिक वाद्यांचा गजर, साउंड सिस्टिमचा दणदणाट, लेसर शो, पारंपरिक खेळांमध्ये महिलांनी घेतलेला सहभाग, तरुणाईचा सळसळता उत्साह आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत सार्वजनिक मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. भरपावसातही गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत संपूर्ण वातावरण गणेशमय झाले होते. त्याची काही टिपलेली क्षणचित्रे... (छायाचित्रे : पद्माकर खुरपे, छोटूसिंग)

49319
इचलकरंजी : शहर वाहतूक शाखेजवळ मानाच्या बिरदेव मंडळाच्या गणेश पालखीचे पूजन व ढोलवादन करीत मिरवणुकीला प्रारंभ करताना खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख. या वेळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह उपस्थित विविध मान्यवर.

49322
इचलकरंजी : मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा अखंड गजर सुरू होता.
49323
इचलकरंजी : पोलिस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीत नृत्याचा असा ठेका धरला.
49326
इचलकरंजी : भरपावसातही वाद्यांचा निनाद सुरूच होता.
49327
इचलकरंजी : पंचगंगा नदीवर क्रेनद्वारे मंडळांच्या उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.
49328
इचलकरंजी : कृत्रिम शेततळ्यात मूर्तींच्या क्रेनद्वारे विसर्जनप्रसंगी महापालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांच्यासह अधिकारी वर्ग.
49338
इचलकरंजी : अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात रिमझिम पावसातही मिरवणूक सुरूच होती.
49339
इचलकरंजी : रात्रीनंतर नेत्रदीपक लेसर शोमुळे मिरवणुकीत लखलखाट निर्माण झाला होता.
49318
इचलकरंजी : मिरवणुकीत पारंपरिक खेळ असलेल्या झिम्मा-फुगडीचा फेर महिलांनी धरला होता.
03871
जयसिंगपूर : विविध मंडळानी पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढून गणपती विसर्जन केले.
01685
सातवणे : मूर्ती घटप्रभा नदीत विसर्जनासाठी नेत असताना चिखलातून कार्यकर्त्यांना अशी कसरत करावी लागली.
49281
आजरा : येथे गणेशोत्सव मिरवणुकीत ढोलताशा पथकाने आणलेली रंगत.
49302
शिरोळ : जय भवानी मंडळाच्या मिरवणुकीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा.
49306
शिरोळ : अजिंक्यतारा मंडळाच्या मिरवणुकीतील मुखवट्यांचा देखावा.
49308
शिरोळ : अजिंक्यतारा गणेश मित्र मंडळाच्या मिरवणुकीतील ढोल पथकावर उभा राहून ताशा वाजवणारा कलाकार.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94924 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..