दोन बातम्या आवश्‍यक आहेत. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन बातम्या आवश्‍यक आहेत.
दोन बातम्या आवश्‍यक आहेत.

दोन बातम्या आवश्‍यक आहेत.

sakal_logo
By

मतदार ओळखपत्राशी
आधार लिंकची आज मोहीम
कोल्हापूर ः उत्तर विधानसभा मतदारसंघ (२७६) अंतर्गत शहरातील मतदारांनी मतदार ओळखपत्र आधारला लिंक करण्याची मोहीम जोडणीसाठी उद्या (ता. ११) सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे. ज्या त्या मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत ‘गरुडा ॲप’ व ‘फार्म ६ वी’ च्या साहाय्याने आधारक्रमांक जोडणीचे काम होणार आहे. सर्व मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. ज्यांना स्वत: आधारची जोडणी करावयाची आहे, अशांनी निवडणूक आयोगामार्फत वोटर हेल्पलाईन ॲप व एनव्हीएसपी पोर्टलवर सुविधा उपलब्ध आहे.

मृताच्या वारसास दोन लाख
कोल्हापूर : अज्ञात वाहनाने ठोकर दिलेल्या मृतांच्या वारसास २ लाख व जबर जखमी झालेल्या व्यक्तीस ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. जनरल इंशुरन्स कौन्सिलद्वारे १ एप्रिल २०२२ पासून याची तरतूद केली आहे. संबंधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94926 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..