इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त
इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त

sakal_logo
By

49333
इचलकरंजी : मल्हारपंत बावचकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेस कमिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मल्हारपंत बावचकर यांना आदरांजली
इचलकरंजी : कै. मल्हारपंत बावचकर यांना शहर काँग्रेस कमिटीची आदरांजली वाहण्यात आली. मल्हारपंत बावचकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब सरनाईक यांचे हस्ते करण्यात आले. काँग्रेस कमिटीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नेत्र रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद खुडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केल. बाबासो कोतवाल यांनी आभार मानले. या वेळी मीना बेडगे, प्रमोद पाटील, शशिकांत देसाई,भूषण शहा, हारुण खलिफा, युवराज शिंगाडे, रवी वासुदेव, किशोर जोशी, अनिल पचिंद्रे, ओंकार आवळकर ,दिलीप पाटील, अजित मिणेकर, रियाज जमादार आदी उपस्थित होते. ताराराणी पक्षाच्या वतीनेही मल्हारपंत बावचकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
-----------------
L49334
इचलकरंजी : स्नेहल माळी हिने वडील राजेंद्र माळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले.

नेत्र तपासणीतून सामाजिक बांधिलकी
इचलकरंजी : येथील स्नेहल माळी या तरुणीने वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमास दिला सामाजिक आयाम दिला. आपली प्रिय व्यक्ती आपल्यातून निघून जाण्याचा दुःखातून सावरत त्याला सामाजिक आयाम देण्याचे काम वस्त्रनगरीतील या तरुणीने केले आहे. जवाहरनगर परिसरातील स्नेहल माळी हिने वडील राजेंद्र माळी यांच्या प्रथम स्मृतिदिनास नातेवाईक तथा उपस्थितांना वृक्षवाटप केले. दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि उपचार मार्गदर्शन याचे आयोजन केले होते. मानवी समुह सुखदुःखात एकत्र येतात तेव्हा त्यातूनही समाजोपयोगी काही घडावे असा पायंडा या आदर्श कृतीतून पडला आहे. या तपासणीत 150 हून अधिक नागरिक सहभागी झाले. या नेत्र तपासणीसाठी सुशांत शेवाळे यांचे सहकार्य लाभले. संयोजनात अमोल पाटील, रोहित दळवी, दामोदर कोळी आदिंनी पुढाकार घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94950 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..