शाहूवाडीत गणेश विसर्सन शांततेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहूवाडीत गणेश विसर्सन शांततेत
शाहूवाडीत गणेश विसर्सन शांततेत

शाहूवाडीत गणेश विसर्सन शांततेत

sakal_logo
By

शाहूवाडी तालुक्यात
४२० मूर्तींचे विसर्जन

शाहूवाडी ः तालुक्यातील एकूण ४२० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी टाळमृदंग, धनगरी ढोल व सिस्टीमच्या दणदणाटात मोठ्या जल्लोषात गणेशांचे विसर्जन केले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका होत्या. कोठेही अनुचित प्रकार न घडता विसर्जन शांततेत झाले. मलकापुरात दुपारी दोन वाजता विसर्जन मिरवणुका निघाल्या. जुना स्टँड गणेश मित्रमंडळाने धनगरी ढोल-ताशांच्या गजरात प्रथम विसर्जन केले. त्यानंतर नगरपालिका गणेश मंडळ, नरहर तरुण गणेश मंडळ, नारायण पेठ गणेश मंडळ, मरिमाई गणेश मंडळ, शाहू गणेश मंडळ, अण्णा भाऊ साठे गणेश मंडळ, संत गोरा कुंभार गणेश मंडळ, सोमवार पेठ गणेश मंडळ, नारायण पेठ गणेश मंडळ, विठ्ठल भक्तगणेश मंडळ, मारुती मंदिर गणेश मंडळ आदी मंडळांच्या विसर्जन मिरवणुका होत्या. शाहूवाडी, बांबवडे, आंबा, सरूड, कापशी, भेडसगाव, मोळवडे, शिंपे, सोते, शिरगाव, कडवे गावांतही गणेशाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात झाले. कडवी, शाळी, वारणा, आंबर्डी या नद्यांमध्ये विसर्जन झाले. पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पोलिस व होमगार्ड यांचा चांगला बंदोबस्त होता.

कोडोली ता. १० : पारंपरिक वाद्यांसह, मल्टिकलर शॉर्पी सिस्टीम आणि लोककलांच्या बहारदार सादरीकरणाने व ‘श्रीं’च्या जयघोषात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन आतषबाजी करत उत्साही वातावरणात मिरवणूक झाली. सुमारे शंभर तर कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीनशेहून अधिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. काही मंडळांनी शुक्रवारी, तर बहुतांश मंडळांनी शनिवारी ‘श्रीं’च्या मूर्तींचे विसर्जन केले. मिरवणुकीत डॉल्बी, ढोल ताशा, लेझीम, बेंजो, सनई अशी पारंपरिक वाद्यांसह परंपरिक नृत्य, मर्दानी खेळासह मिरवणुकीत सहभागी झाले होते. कोडोली येथील नवसाचा मानला जाणार कुंभार समाजाच्या श्री नरसिह मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणूक शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू होऊन शनिवारी सायंकाळी चार वाजता विसर्जन होऊन मिरवणुकीची सांगता ३० तासांनी झाली. कोडोली ग्रामपंचायतीतर्फे मंडळांना श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात येत होता. कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध नियोजन केल्याने मिरवणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडली.


00593
मांडुकली : येथील जय अंबिका तरुण मंडळाच्‍या कार्यकर्त्यांनी हलगी व घुमक्‍याच्‍या तालावर लेझीमचा ताल धरला.

गनबावडा तालुक्‍यात भक्तिमय निरोप
असळज : विघ्नहर्त्या गणरायाला गगनबावडा तालुक्‍यात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्‍पा मोरया, पुढच्‍या वर्षी लवकर या’चा जयघोष, फटाक्‍यांच्‍या आतषबाजी, गुलालाची उधळण व पारंपरिक वाद्यांच्‍या तालावर तरुणांनी धरलेला फेर हे यावर्षीच्‍या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. तालुक्‍यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी दुपारनंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली. लेझीम, झांजपथक या पारंपरिक वाद्यांचा वापर बहुतांश ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी केला होता. हलगी व घुमक्‍याच्‍या तालावर तरुणांनी लेझीमचा ताल धरला. लाडक्या बाप्पाची गावातून मिरवणूक काढून सायंकाळच्या सुमारास गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94956 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..