महाद्वार चेंगराचेंगरी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाद्वार चेंगराचेंगरी बातमी
महाद्वार चेंगराचेंगरी बातमी

महाद्वार चेंगराचेंगरी बातमी

sakal_logo
By

49217

महाद्वाररोडवर चेंगराचेंगरी
दोन घटनांत तीन महिला जखमी, वांगी बोळात गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान महाद्वार रोडवर दोन वेळा चेंगराचेंगरीची घटना घडली. पहिली घटना संध्याकाळी ७ वाजता, तर दुसरी घटना रात्री एकच्या सुमारास घडली. दोन्ही घटनांत तीन महिला जखमी झाल्या. त्यांना उपस्थितांनी बाजूला घेऊन त्यांची सेवा केली. अरुंद जागेत क्षमतेपेक्षा जास्त लोक आल्याने या घटना घडल्या.
महाद्वार रोडवर वांगी बोळाच्या तोंडाला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अवचितपीर तालीम मंडळाचा गणपती आला. या तालमीने रशियाच्या ज्युलिया यांना डी.जे.म्हणून आणले होते. त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाली होती. यात गणपती त्याच्या समोर नाचणारे कार्यकर्ते आणि दोन्ही बाजूंनी नागरिक ये-जा करत होते. गर्दी वाढल्यावर तेथे पुढे किंवा मागे जाण्यासाठी जागाच उरली नाही. त्यात दोन महिला खाली पडल्या. त्यांना उचलण्यासाठी काहीजण खाली वाकले. त्यांच्या अंगावर नागरिक पडले. त्या महिला गर्दीत चेंगरल्या. अखेर त्यांना गर्दीतून बाहेर काढून वांगी बोळात आणले. त्यांना पाणी दिले, मात्र काही क्षणासाठी त्यांना गुदमरल्यासारखे झाले होते. ही घटना घडल्यावर महाद्वार रोडवरील सर्व जमाव बोळात शिरला. त्यामुळे बोळातूनही पुढे जाता आले नाही. अखेर काही वेळाने ही गर्दी कमी झाली. अशाच प्रकारची दुसरी घटना रात्री १ वाजण्याच्या सुमारास ताराबाई रोडवर घडली महाद्वारच्या दिशेने वेताळ तालीम मंडळाची गणेश मूर्ती येत होती, तर ताराबाई रोडने हिंदवी स्पोर्ट्सची मूर्ती आली. दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने येथे गर्दी झाली. नागरिकांना पुढे जाण्यासाठी वावच राहिला नाही. त्यामुळे तब्बल २० मिनिटे येथे नागरिकांची कोंडी झाली होती. यावेळी येथेही चेंगराचेंगरीची घटना घडली. अरुंद जागा आणि दोन्ही बाजूंना नागरिकांची ये-जा सुरू असल्याने हे घडले.

---------------
दुपारी महाद्वार रोड रिकामा
रात्री पाय ठेवायलाही जागा नसणाऱ्या महाद्वाररोडवर दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकही गणपती नव्हता. त्यामुळे आख्खा रस्ता रिकामा होता. ऐन मिरवणुकीत रस्ता रिकामा असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94959 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..