मराठा सेवा संघाचे आज अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा सेवा संघाचे आज अधिवेशन
मराठा सेवा संघाचे आज अधिवेशन

मराठा सेवा संघाचे आज अधिवेशन

sakal_logo
By

मराठा सेवा संघाचे आज
कुरुंदवाडला अधिवेशन
सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. १० ः मराठा सेवा संघ कोल्हापूरच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत रविवारी (ता. ११) जैन सांस्कृतिक भवन, कुरुंदवाड-नृसिंहवाडी रोड (ता. शिरोळ) येथे अधिवेशन होणार आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होत असून त्यास प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, प्रदेश महासचिव मधुकरराव मेहकरे, अंकुर कावळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अधिवेशनाला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह बेळगाव जिल्ह्यातील मराठा सेवा संघासह अन्य सर्व कक्षांचे पदाधिकारी व सदस्य हे अधिवेशन तीन सत्रामध्ये आयोजित केले आहे. प्रथम सत्रात उद्‌घाटन समारंभ आयोजित केला असून, अधिवेशनाचे उद्‌घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. सत्रास अप्पर जिल्हाधिकारी किशोर पोवार, नितीन देसाई (अतिरिक्त आयुक्त), समरजित आनंदराव थोरात (सहआयुक्त वस्तु व सेवा कर विभाग), अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक) उपस्थित राहणार आहेत. उर्वरित सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94968 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..