सार्वजनिक गणेशोत्‍सवात २६०० मुर्तींचे संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक गणेशोत्‍सवात २६०० मुर्तींचे संकलन
सार्वजनिक गणेशोत्‍सवात २६०० मुर्तींचे संकलन

सार्वजनिक गणेशोत्‍सवात २६०० मुर्तींचे संकलन

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून.

सार्वजनिक गणेशोत्‍सवात
२६०० मूर्तींचे संकलन
पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवास मंडळांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ११ : घरगुती गणपती विसर्जनावेळी जिल्‍हा परिषदेने राबवलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवास घरगुती गणपती विसर्जनावेळी प्रतिसाद मिळाला. सुमारे अडीच लाखांपेक्षा अधिक मूर्ती दान केल्या. सार्वजनिक गणेशोत्‍सवात सहभागी तरुण मंडळांनीही पर्यावरणपूरक उत्सव साजरा करीत तब्‍बल २ हजार ५९० मूर्ती दान केल्या. १७ हजार ३३८ किलो निर्माल्यही संकलन केले. अनेक वर्षांपासून जिल्‍हा परिषद पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा करत आहे. गणेशोत्‍सव सुरू होण्यापूर्वीच त्याचे नियोजन केले जाते. जिल्‍हा परिषदेपासून गटविकास अधिकारी कार्यालय आणि ग्रामपंचायती यांचा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला जातो. यावेळीही काटेकोर नियोजन केले होते. जास्‍तीत जास्‍त लोकांनी गणेशमूर्ती दान कराव्यात, यासाठीचे नियोजन व प्रबोधन केले होते. त्यामुळेच यावर्षी २ लाख ७१ हजार ४४९ लोकांनी मूर्तिदान केले, तर सार्वजनिक गणेशोत्‍सवात सहभागी घेणाऱ्या‍ मंडळांनीही मूर्तिदान करून पर्यावरणपूरक गणेशोत्‍सवात योगदान दिले.


दृष्टिक्षेपात
घरगुती मूर्ती ३१४
ासार्वजनिक मूर्ती २२७६
एकूण मूर्ती २५९०
निर्माल्य संकलन १७ हजार ३३८ किलो

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94992 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..