विकास खारगेंचा विद्यार्थ्यांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास खारगेंचा विद्यार्थ्यांशी संवाद
विकास खारगेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

विकास खारगेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

sakal_logo
By

49374

विकास खारगेंचा विद्यार्थ्यांशी संवाद
इचलकरंजी : विद्यार्थ्यांचे शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास होय. करिअर डेव्हलपमेंटमध्ये अनेक संधी आहेत. त्यामुळे दहावीला चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाचे वाचन मनापासून करा, असे प्रतीपादन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. दगडूलाल मर्दा फौंडेशन सी. एस. आर. फंडातून अत्याधुनिक संगणक कक्षासाठी ज्यांनी अकरा लाख रुपये देणगी दिली. तसेच माजी विद्यार्थी वाळवेकर यांच्याकडून ३५ ते ४० सायकल गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आयुक्त सुधाकर देशमुख, लक्ष्मीकांत मर्दा, उल्हास पुजारी, मुख्याध्यापक तथा क्रीडा अधिकारी शंकर पोवार आदी उपस्थित होते.
--------------
शाळा वार्षिक तपासणी बैठक
इचलकरंजी : राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये खाजगी माध्यमिक शाळा वार्षिक तपासणी बैठक डाएटचे डॉ. आय. एस. शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. डॉ. शेख यांनी वार्षिक तपासणी कशी केली जाणार याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापकांचे, शिक्षकांनी शिक्षकांचे स्वयंमूल्यमापन करायचे आहे. क्रिएटीव्ह तपासणी झाली पाहिजे. चुका काढण्यापेक्षा सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. आपल्यातील चुका रिमुव्ह कराव्यात. फक्त कागदोपत्री शाळा सुंदर न होता. विद्यार्थी ज्ञानार्थी व्हावा, असे सांगितले. विजय भिसे, गटशिक्षणाधिकारी प्रवीण फाटक, रमेश कोरे, जाधव, अशोक हूबळे, पी. डी. शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95016 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..