कसबा बावडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा बावडा
कसबा बावडा

कसबा बावडा

sakal_logo
By

49435
कसबा बावडा ः डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे युवा संशोधक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. सत्त्वशील पोवार यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. महादेव नरके. शेजारी उपप्राचार्या मीनाक्षी पाटील, प्रा. महेश रेनके, प्रा. अक्षय करपे, प्रा. सचिन जडगे आदी.

नावीन्यपूर्ण स्टार्ट अप सुरू करावेत
---
डॉ. पोवार; डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये स्टार्टअप अॅण्ड इनोव्हेशनवर मार्गदर्शन
कसबा बावडा, ता. ११ ः तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण स्टार्ट अप विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच सुरू करावेत, असे प्रतिपादन
आयआयटी- मंडी (हिमाचल प्रदेश) येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. सत्त्वशील पोवार यांनी केले. कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना स्टार्टअप अॅण्ड इनोव्हेशन या विषयावर केले.
डॉ. पोवार यांनी सांगितले, की अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींकडे आणि घडणाऱ्या घटनांकडे बारीक लक्ष असणे आवश्यक असते. डोळसपणे आपण जर या विषयी गोष्टींकडे पाहिले तर नक्कीच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, यातूनच लोकांना नेमकी कोणती अडचण आहे, आणि त्यातून नेमका त्यावर काय उपाय काढावा? हे समजून येते. डॉ. पोवार यांनी काही यशस्वी स्टार्ट अपची वाटचाल सांगितली. तसेच, नवीन स्टार्ट अप सुरू केल्यावर तो कसा वाढवावा?, आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत उदाहरणासह स्पष्टीकरण दिले.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी स्टार्टअप ही काळाची गरज बनली असून, याला प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना आहेत. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट करताना अशा स्टार्ट अपचा विचार डोळ्यांसमोर ठेवावा, असे सांगितले. माजी विद्यार्थी अमृत उत्तम नरके, स्नेहल पाटील, गायत्री पाटोळे यांचा डीएक्ससी या कंपनीत कॅम्पस इंटरव्यूमधून निवड झाल्याबद्दल सत्कार डॉ. पोवार यांच्या हस्ते झाला. या वेळी आयएसटी- नवी दिल्ली संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावर युवा संशोधक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. पोवार यांचा सत्कार झाला. या वेळी उपप्राचार्या मीनाक्षी पाटील, प्रा. महेश रेनके, प्रा. अक्षय करपे, असिस्टंट रजिस्ट्रार प्रा. सचिन जडगे आदी उपस्थित होते. प्रा. असिफ पटेल यांनी स्वागत केले. प्रा. वृषाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95080 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..