उमा महेश्‍वर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमा महेश्‍वर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात
उमा महेश्‍वर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

उमा महेश्‍वर पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात

sakal_logo
By

49453
जरळी : श्री उमा महेश्‍वर पतसंस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल बसवराज बाबांनावर यांचा सत्कार करताना बाबासाहेब पाटील, शिवगोंडा देसाई, शिवाजी डोंगरे, टी. एम. दुंडगे शिवाजीराव होडगे व इतर.

उमा महेश्‍वर पतसंस्थेची
वार्षिक सभा उत्साहात
नूल, ता. ११ : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील श्री उमा महेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. संस्थेचे अध्यक्ष शिवगोंडा देसाई अध्यक्षस्थानी होते.
टी. एम. दुंडगे यांनी स्वागत केले. सचिव एम. जी. गुडीमनी यांनी अहवालवाचन केले. आर्थिक वर्षात संस्थेला तीन लाख ९३ हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना शेकडा १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला. संस्थेकडे तीन कोटींच्या ठेवी असून एक कोटी सात लाखांची कर्जे वाटप केली आहेत. संस्थेची एक कोटी ७५ लाख रुपये गुंतवणूक आहे. कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त जरळी हायस्कूलचे शिक्षक बसवराज बाबानावर यांचा बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला. तसेच आदर्श सचिव पुरस्काराबद्दल जोतिबा चौगुले, जरळी हायस्कूलमधील दहावीचे गुणवंत विद्यार्थी सानिका दुंडगे, राजनंदिनी माने, सानिका कांबळे, व श्रद्धा देसाई यांचाही रोख बक्षीस देऊन संस्थेतर्फे सत्कार झाला. या वेळी शिवगोंडा देसाई, उपाध्यक्ष मधुकर वाघमोडे यांच्यासह संचालक शिवाजी डोंगरे, शिवाजीराव होडगे, अमृत भोसले, आप्पासाहेब माद्याळे, कार्तिक स्वामी, बाबासाहेब पाटील, अरुण लोंढे, रावसाहेब कांबळे, धोंडिबा जाधव, शरद मंगसुळे, विठ्ठल चौगुले आदींसह सभासद उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95091 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..