गांधीनगरातील धोकादायक खड्ड्याकडे पालिकेचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगरातील धोकादायक खड्ड्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
गांधीनगरातील धोकादायक खड्ड्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

गांधीनगरातील धोकादायक खड्ड्याकडे पालिकेचे दुर्लक्ष

sakal_logo
By

49454
गडहिंग्लज : गांधीनगर सोसायटीच्या कोपर्‍यावर रस्त्याच्या मधोमध हा धोकादायक खड्डा असून पालिकेने खड्ड्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.

गांधीनगरातील धोकादायक
खड्ड्याकडे पालिकेचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : आजरा रोडवरील गांधीनगर सोसायटीच्या कोपऱ्यावर रस्त्याच्या मधोमध जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदलेला खड्डा वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. दोन वाहने खड्ड्यात रूतल्याने परिसरातील तरुणांनी या खड्ड्यावर खबरदारी म्हणून ट्री गार्ड ठेवले आहे. पालिकेने तत्काळ याकडे लक्ष देवून हा खड्डा मुरुमाने मजबुतीकरण करुन घेण्याची मागणी होत आहे.
गेल्या महिन्यात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खड्डा खोदला. वाहिनी दुरुस्त झाली. त्यानंतर हा खड्डा भरुन घेतला. परंतु, केवळ मातीने भरलेला हा खड्डा पावसात खचू लागला आहे. काळी माती असल्याने वाहने खाली उतरत आहेत. दोन दिवसापूर्वीच एक मालवाहू मोटार या खड्ड्यात रुतली. वाहनातील माल उतरवून वाहन बाजूला करण्यात आले. सुदैवाने अपघात झाला नाही. यामुळे गांधीनगरातील तरुणांनी वाहनधारकांसाठी खबरदारी म्हणून खड्ड्यावर ट्री गार्ड ठेवले आहे.
या मार्गावरची वर्दळ अधिक असल्याने हा खड्डा धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरुन पालिकेचे अधिकारी ये-जा करतात. परंतु कोणालाही हा धोकादायक खड्डा दिसत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. कडक मुरुमाद्वारे हा खड्डा मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे. वाहनांची वर्दळ अधिक असल्याने कायमची उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शहरातील मुख्य रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. मुरुमाद्वारे खड्डे भरुन घेतले जात आहेत. मात्र पुन्हा पावसाने ते उखडत आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95105 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..