इचलकरंजीत भटक्या गायींचा प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत भटक्या गायींचा प्रश्‍न
इचलकरंजीत भटक्या गायींचा प्रश्‍न

इचलकरंजीत भटक्या गायींचा प्रश्‍न

sakal_logo
By

इचलकरंजीत भटक्या गायींचा प्रश्‍न
संगोपनासाठी गोसेवा संस्थेस जागा देऊनही उपद्रव सुरूच
इचलकरंजी, ता. ११ ः शहरातील भटक्या गायींच्या समस्येपासून सुटकारा मिळण्यासाठी पालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये एका गोसेवा संस्थेस २० गुंठे जागा दिली होती. त्यामध्ये अन्नासाठी भटकणाऱ्‍या गायींचा सांभाळ होईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र अद्याप ही भटक्या गायींचा उपद्रव सुरूच आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्र्वभूमीवर सजलेल्या बाजारपेठ व मार्गावर झालेल्या गर्दीवेळी नागरिकांना भटक्या गायींचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. फटाकड्याच्या आवाजास घाबरून पळताना अनेकांना धक्का लागून दुखापत ही झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
शहरात फिरणाऱ्‍या भटक्या गायींच्या समस्येवर उपाय म्हणून त्यावेळी पालिकेने गायी सांभाळण्यासाठीचे गोशाळांचे प्रस्ताव मागितले होते. यावेळी विविध सहा गोसेवा संस्थांनी प्रस्ताव दिले होते. यामधील एका गोसेवा संस्थेस मंजूरी देवून त्यांना गैबान पेट्रोल पंप परिसरातील जागा दिली. या जागेचा करार करून त्याचा कालावधी एक वर्षाचा निश्चित केला होता. महापालिका व गोसेवा संस्थेमध्ये झालेल्या कराराची मुदत संपत आली आहे. मात्र अद्याप शहर भटक्या गायींच्या समस्येमधून मुक्त झाले नाही. या गायी अन्नाच्या शोधात फिरत असल्याने यांचा उपद्रव वाढत आहे. गायी रस्त्यावरून पळताना अथवा मुख्य चौक, रस्त्यावर मधोमध बसल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेवून जावे लागते. अनेकदा या भटक्या गायींच्या धडकेत दुचाकीस्वार, आठवडी बाजरांमध्ये महिला गंभीर जखमी होतात. या गायींचा बंदोबस्त आवश्यक बनला आहे.
----------
जबाबदारी कोणाची?
महापालिका प्रशासनाने जागा दिली असताना अद्याप भटक्या गायी शहरात का फिरत आहेत. केवळ जागा दिल्यानंतर महापालिकेची जबाबदारी संपली आहे का?, जागा दिलेल्या संस्थेच्या कामकाजावर महापालिका प्रशासनांचे लक्ष आहे का?, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत. मात्र यावर ठोस उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांचा भ्रमनिरास होताना दिसत आहे.
---
मालकांवर कारवाईची गरज
इचलकरंजी शहरात सुमारे २५० हून अधिक भटक्या गायी फिरत आहेत. त्यामधील अधिकतर गायींचे मालक आहेत. गायींना पकडण्याची मोहीम सुरू केली असता मालक हे अधिकाऱ्‍यांसोबत वादावादी करतात. हे मालक केवळ या गायींपासून मिळणाऱ्‍या लाभासाठी येत असतात. अशा गायी मालकांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95129 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..