कामगार चाळीत व्यसनमुक्तीची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार चाळीत व्यसनमुक्तीची शपथ
कामगार चाळीत व्यसनमुक्तीची शपथ

कामगार चाळीत व्यसनमुक्तीची शपथ

sakal_logo
By

49512
----------
कामगार चाळीत व्यसनमुक्तीची शपथ
इचलकरंजी ः महापालिकेतील कर्मचारी व्यसनमुक्त व्हावेत आणि त्यांचे जीवनमान उंचावले जावे, यासाठी प्रशासक सुधाकर देशमुख यांनी प्रभाग १२ मधील कामगार चाळीत कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रवी रजपुते सोशल फाउंडेशनतर्फे उपक्रमाचे आयोजन केले होते. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी प्रास्ताविक केले. सफाई कर्मचाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. नोकरी प्रामाणिकपणे करीत कुटुंबाची प्रगती करण्यावर भर दिला पाहिजे, असे श्री. देशमुख यांनी नमूद केले. नगरसचिव विजय राजापुरे यांनी सूत्रसंचालन केले. शेखर अवघडे, शेखर वराळे, संतोष रेडेकर, विशाल सोनीकर, सूरज कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95166 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..