सुरुपली,कुरणी बंधारे पाण्याखाली. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरुपली,कुरणी बंधारे पाण्याखाली.
सुरुपली,कुरणी बंधारे पाण्याखाली.

सुरुपली,कुरणी बंधारे पाण्याखाली.

sakal_logo
By

सुरुपली,कुरणी बंधारे पाण्याखाली.
मुरगूड,ता.११ : कालपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यामूळे वेदगंगा नदीवरील कुरणी- मुरगूड दरम्यान असणाऱ्या कुरणी बंधार्‍यावर तसेच मळगे सुरुपली दरम्यानच्या सुरुपली बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी सध्या मुरगूड - निढोरी- कुरणी अशी लांब पल्याची वाहतूक सुरू आहे.
वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग वेदगंगा नदी पात्रात सुरु आहे. तसेच संततधार सुरु असणाऱ्या दमदार पावसाने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
वेदगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर आले असून नदीवरील बंधाऱ्यावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.शिंदेवाडी - मुरगूड शहराला पाणीपुरवठा करणारा सर पिराजीराव तलाव देखील यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरला आहे.तेथून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वेदगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
......
फोटो : मुरगूड : येथील वेदगंगा नदीवरील कुरणी बंधारा पाण्याखाली गेला आहे.त्याचे छायाचित्र.mur112.jpg

ajr113.txt
ajr113.jpg.... साळगाव (ता. आजरा) ः येथील हिरण्यकेशी नदीवरील पाण्याखाली गेलेला साळगाव बंधारा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजरा तालुक्यात अतिवृष्टी, साळगाव पाण्याखाली
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. 11 ः आजरा तालुक्यात गत चोवीस तासात अतिवृष्टी झाली. पावसामुळे हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्रा बाहेर पडली आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. आजरा पेरणोली वहातुक बंद झाली आहे. या मार्गावरील वहातुक साेहाळे मार्ग वळवण्यात आली आहे. पावसाची संततधार सुरु आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले पंधरा दिवस पावसाने उसंत घेतली होती. या दोन दिवसात पावसाने पुन्हा सुरवात केली आहे. गत चोवीस तासात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्राच्या बाहेर पडल्या आहेत. या नदीला पुर आला आहे. आेढे, नाले खळाळून वहात आहेत. नदी व आेढ्या काठावरील शेतामध्ये पाणी घुसले आहे. आज दुपारी चार वाजता हिरण्यकेशीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वहातुक सोहाळे मार्ग वळवली आहे. तालुक्यात पाऊस मापन केंद्रावर पावसाची झालेली नोंद अशी - आजरा - 112 गवसे- 90, मलिग्रे -98, उतूर -28. तालुक्यात सरासरी 82 मिलीमीटर पाउस झाला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रणजित कालेकर.........................................................आजरा.........................................................ता. 11

तुरुकवाडी, ता .११ : चांदोली धरणपाणलोट क्षेत्रात गेले १२ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने
जोरदार सुरवात केली आहे .

चांदोली , कांडवण, कडवी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती . गेले दोन दिवसांपासून शाहूवाडी तालुक्यात पावसाने धुवाधार सुरवात केली आहे . कांडवण, कडवी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे . चांदोली धरण शंभरी पार करण्याचे स्थितीत आहे. तालुक्यातील सर्वच धरणाची पाणी साठवण क्षमता संपली . पावसाचा जोर असाच राहिल्यास आवक पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धरण प्रशासनाला धरणातून विसर्ग वाढविणे हा एकमेव पर्याय असल्याने चांदोली , कडवी धरणातून मोठ्याप्रमाणात विसर्ग करणे आवश्यक आहे . परिमाणी कानसा, कडवी, वारणानदीला पूरस्थिती उद्भवण्याचा धोका आहे . तिस-यांदा नदीकाठची पिके पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे . ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणा-या वारणा धरणात ३३.३४ टीएमसी पाणी साठा झाला असून धरण ९७ टक्के भरले आहे . धरण शंभर टक्के भरण्यास निव्वळ एक टीएमसी पाणी आवश्यक आहे .पाणी पातळी ७४९ मीटर, चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात ६० मिली मिटर तर एकुण २४५७ मिमी पावसाची नोंद वारणावती प्रजन्यमापक यंत्रावर झाली आहे .तर पाणलोट क्षेत्रातून २३५८ क्युसेक पाण्याची आवक सुरु असून सद्यास्थितीत धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे .

पिंपळगाव ता.११
नागणवाडी (बारवे- दिंडेवाडी) ता.भुदरगड येथिल प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरलेला आहे.
धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने सांडव्यावरून ७३० क्यूसेक्स ने पाणी नदीपात्रात येत आहे, तरी नदी काठच्या गावांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.आज दिवसभर धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे.चिकोत्रा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.

पुनाळ परीसरात मुसळधार..
पुनाळ,ता.११: येथील परीसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे.अचानक पावसाचा जोर वाढल्याने कासारी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.कासारी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.मुसळधार पावसाने शेती कामात व्यत्यय आला आहे. पाणी झपाट्याने वाढत असल्याने दोन्ही तीरावरील नागरिकांना धरण संस्थेने सावधानतेचा इशारा दिला आहे.गेल्या आठवड्यात कधीतरी पडणारा पाऊस अचानक मुसळधार कोसळु लागल्याने भितीचे वातावरण असले तरी पडझडीच्या ,नुकसानीच्या घटना घडलेल्या नाहित हि जमेची बाजू आहे.


kwd111.txt
बातमी क्र. 1
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. 11 ः कोवाड परिसरात शनिवारी दुपार पासून जोरदार पावसाने झोडपले. रविवारी दिवसभर पाऊसाची संततधार सुरु होती. अचनाक सुरु झालेल्या पावसामुळे परिसरातील ओढ्याना पाणी येऊन निट्टूर, कडलगे हे मार्ग बंद झाले होते. ताम्रपर्णी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून पाऊसाचा जोर आणखीन वाढल्यास सोमवारी सकाळी कोवाड,माणगांव व कामेवाडी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्रभर पाऊस पडल्याने ओढ्याना पाणी येऊन दुपारपर्यंत ठिकठिकाणी वाहतूक बंद झाली होती. निट्टूर ओढ्यावर पाणी जास्त असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी वाहतूक बंद केली होती. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. कोवाड बाजारपेठेतील कांही व्यापाऱ्यानी रविवारी दुपार पासून साहित्याची हालवाहालव सुरु केली होती. जोरादार झालेल्या पावसामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊसाचे पिक भूईसपाट झाले आहे. भूईमुग, सोयाबिन पिकानाही पावसाचा फटका बसला आहे. पाऊस थांबला नाही तर पुन्हा पूराचे संकट ओढवणार असे दिसते.
----------------------
कोवाड ः निट्टूर ओढ्यावर रविवारी सकाळी पावसाचे पाणी आले होते.
kwd111
--------------
अशोक पाटील.........................कोवाड
ता. 11-9-22

फोटो chd117.jpg नागनवाडी ः आठवडा बाजारात काही दुकानात असे पाणी शिरले होते.
---------------------------
घटप्रभा, ताम्रपर्णी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
चंदगड ः तालुक्यात शनिवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला. रात्रभर झालेल्या पावसाने ताम्रपर्णी व घटप्रभा नदींच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता. अशीच स्थिती राहिल्यास उद्या पर्यंत नद्यांच्या पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत सुमारे आठवडाभर पावसाने उसंत घेतली होती. मध्ये- मध्ये वळीव स्वरुपाचा पाऊस होत होता. परंतु शनिवार पासून पुन्हा गती घेतली आहे. मुसळधार पाऊस, थंडगार वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज नागनवाडी येथे आठवडा बाजारात रस्त्यावर लावलेल्या काही दुकानात पाणी शिरले. पावसामुळे ग्राहकांनीही बाजाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.
------------------------
सुनील कोंडुसकर......चंदगड......
ता. 11-9-22

कुंभी प्रकल्प भरला.

गगनबावडा परिसरात परतीच्या पावसाची रिपरिप

गगनबावडा, ता.11

कुंभी प्रकल्प शंभर टक्के भरला असून तालुक्यातील वेसरफ, अंदुर व कोदे हे तीन अन्य लघु पाटबंधारे प्रकल्प जुलै मध्येच भरले आहेत.
गेले तीन-चार दिवस गगनबावडा परिसरात परतीच्या पावसाची रिपरिप चालूच आहे. सदर पाऊस भात, नाचणी व ऊस पिकांसाठी चांगला असल्याने बळीराजा आनंदात आहे.
गगनबावड्यासह पन्हाळा व करवीर या तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पामुळे हजारो एकर शेती सिंचनाखाली येते. कुंभी प्रकल्प क्षेत्रात आज अखेर 5824 मि. मी. तर तालुक्यात आज अखेर सरासरी 3963 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कुंभी प्रकल्पातून रेडियल गेट द्वारे 900 तर पावर हाउस मधून 300 असा एकूण 1200 क्युसेक पाणी विसर्ग चालू आहे.

सोबत फोटो :Gag 11011

फोटो ओळ: लखमापूर :कुंभी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला.

पोर्ले तर्फ ठाणे.ता.११-आसुर्ले -केर्ले दरम्यानच्या ओढ्याजवळील रस्त्यावर भले मोठे झाड पडल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली . त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.अनेकांच्या प्रयत्नाने वाहतूक सुरळीत झाली.
        याबाबत घटनास्थळी मिळाल्याली माहिती अशी आसुर्ल-केर्ले दरम्यान कोल्हापूर रस्त्यावर शशिकांत माने यांच्या घराजवळचे भले मोठे झाड आज पहाटे पाचच्या दरम्यान उमजून रस्त्यावर पडल्याने वाहतूक चार तास वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरावर पाऊस पडत आहे.त्यामुळे हे झाड उमजून पडले. दत्त दालमिया साखर कारखाना ते कोडोली फाटा दरम्यान अनेक झाडे रस्त्याकडे झुकलेली दिसत आहेत.
झाड बाजूला करण्यासाठी सागर पोवार. दत्तात्रय पाटील. वसंत लोंढे. पांडूरंग जाधव. बाजीराव पोवार. सागर शिर्के. यांच्यासह अनेकानी झाड रस्त्यावरून हटवण्यात मदत केली.
फोटो ओळी-
केर्ले-येथे कोल्हापूर रस्त्यावर झाड पडल्याने काही तास वाहतूक ठप्प होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95184 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..