सामान्य शमनजींचे असामान्य कार्य, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामान्य शमनजींचे असामान्य कार्य, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
सामान्य शमनजींचे असामान्य कार्य, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

सामान्य शमनजींचे असामान्य कार्य, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

sakal_logo
By

49564

सामान्य शमनजींचे
असामान्य कार्य
---
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती; गडहिंग्लजला नागरी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : कडगावसारख्या छोट्या गावातील सर्वसामान्य डॉ. रियाज शमनजी यांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रात असामान्य कार्य करून दाखविले आहे. शिक्षणातून त्यांनी ग्रामीण भागात समृद्धी आणली. हे त्यांचे कार्य आदर्शवतच आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी आज येथे केले.
शमनजी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. रियाज शमनजी यांच्या वाढदिवसानिमित्त रियाज शमनजी वाढदिवस गौरव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते शमनजी यांचा नागरी सत्कार झाला. डॉ. आंबेडकर भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. माजी आमदार संजय घाटगे, उपनेते अरुण दुधवडकर, मुंबईचे सदा परब, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाटगे म्हणाले, ‘‘शमनजी यांनी निवडणुकीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात यावे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करू.’’ दुधवडकर म्हणाले, ‘‘अनेक लोक पैसे कमवण्यासाठी मुंबईकडे येतात. परंतु शमनजी हे आपल्या भागाच्या विकासासाठी मुंबई सोडून गावाकडे आले आणि शिक्षणात कार्य केले.’’
शमनजी म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन चार दशके शिवसेनेत सक्रिय आहे. त्यांच्या प्रेरणेने गावी येवून शिक्षण संस्था सुरु केली. त्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले. जनतेच्या प्रेमामुळे मी नेटाने पुढे चालत राहिलो. भविष्यात शिवसेना संधी देईल तेथे निष्ठेने काम करेन.’’
या वेळी विजय देवणे, संजय पवार, सदा परब यांची भाषणे झाली. पी. डी. पाटील यांनी स्वागत केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मण कंग्राळकर, सुलोचना रेडेकर, दिलीप माने, संतोष चिकोडे, प्रभाकर खांडेकर, रेश्मा शमनजी, नीलेश कंग्राळकर, प्राचार्य मुरलीधर माळी, नितीन पाटील, सिमरन शमनजी, रमेश रिंगणे, संदीप कुराडे, विठ्ठल भमानगोळ, वसंत नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान, वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शमनजी यांना शुभेच्छा दिल्या.

चौकट..
म्हणून राजकारणाकडे दुर्लक्ष
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदी संधी मिळाली आणि दोन वर्षे कोरोना महामारीत गेली. कोविडविरुद्धची लढाई सोपी नव्हती. पण ठाकरेंनी त्याला खंबीरपणे तोंड दिले. परंतु याच कालावधीत त्यांचे राजकारणाकडेही दुर्लक्ष झाले.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95216 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..