काँग्रेस झिम्मा फुगडी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस झिम्मा फुगडी स्पर्धा
काँग्रेस झिम्मा फुगडी स्पर्धा

काँग्रेस झिम्मा फुगडी स्पर्धा

sakal_logo
By

49487

झिम्मा-फुगडीत धनलक्ष्मी ग्रुपची बाजी
जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः पारंपरिक गीतांच्या तालावर धरलेला फेर, प्रोत्साहनासाठी टाळ्यांचा गजर आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा जागर अशा उत्साही वातावरणात आज महिलांनी कलाविष्कार सादर केला. निमित्त होते जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित झिम्मा-फुगडी स्पर्धेचे. काँग्रेस कमिटीत झालेल्या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे झिम्मा-फुगडीचा फेर धरला. दरम्यान, झिम्मा स्पर्धेत धनलक्ष्मी ग्रुप (पंडेवाडी) व राधेय ग्रुप (कोल्हापूर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावला. सकाळी अकराच्या सुमारास स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा झाला. आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
विविध विभागांत स्पर्धा झाल्या. झिम्मा-फुगडी, काटवटकाणा, उखाणे, छुई फुई, घागर घुमविणे, सूप नाचविणे अशा पारंपरिक लोककला आणि खेळांत महिला दंग झाल्या. वय वर्षे शंभर असणाऱ्या आजींनी झिम्मा-फुगडी स्पर्धेत सहभाग घेतला, तर ६५ वर्षांच्या आजींनी काटवटकणा सादर करत प्रथम क्रमांकही पटकावला. स्पर्धेत सहभागी महिलांच्या संघांनी सामाजिक संदेश देत सादर केलेल्या पारंपरिक लोककलांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. या महिलांनी खेळातून लेक वाचवा, झाडे लावा, प्रदूषण टाळा असे सामाजिक संदेश दिले. यावेळी संध्या घोटणे, वैशाली महाडिक, भारती पवार, सुलोचना नायकवडी आदी होते.
परीक्षण सुलोचना बागडी, पूनम देसाई यांनी केले. प्रा. श्वेता परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन ॲड. भाग्यश्री पाटील व अश्विनी जाधव यांनी केले.
----------
स्पर्धेतील अनुक्रमे विजेते असे- *घागर घुमविणे- मेघा माळी, मानसी सरनाईक, मंगल करले
*सूप नाचविणे- कोमल वाइंगडे, सिमरन पाटील, सरिता पाटील.
*काटवटकणा- साताबाई पाटील, वर्षा पाटील, अश्विनी कातरे, उत्तेजनार्थ शेवंताबाई पंडे.
*फुगडी -तृप्ती पोवार -प्रणाली पोवार, वर्षा पाटील-वैजयंती कुलकर्णी, अर्पिता राबाडे- मैत्री राबाडे.
*झिम्मा-फुगडी- उत्तेजनार्थ नारायणी ग्रुप (कोल्हापूर), ‘बीजीएम्’ ग्रुप (कोल्हापूर), बोरजाई महिला मंडळ (देसाईवाडी), ज्ञानेश्वर माऊली (चंद्रे), नागनाथ गणेश मंडळ (सोनाळी)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95218 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..