डॉ. लवटे यांचे व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. लवटे यांचे व्याख्यान
डॉ. लवटे यांचे व्याख्यान

डॉ. लवटे यांचे व्याख्यान

sakal_logo
By

49556
कोल्हापूर : ‘आम्ही आनंदयात्री’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

दुःख हलके करतो तोच आनंदी
डॉ. सुनीलकुमार लवटे : ‘आम्ही आनंदयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर, ता. ११ : ‘‘स्वतःच्या पलीकडे जाऊन जगता आले पाहिजे, स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करता आले पाहिजे, तरच खरा आनंद मिळतो. दुसऱ्याचे दुःख हलके करण्यासाठी जो काम करतो तोच ख-या अर्थाने आनंदी असतो,’’ असे उद्‌गार डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी काढले.
डॉ. पांडुरंग पुजारी यांनी लिहिलेल्या ‘आम्ही आनंदयात्री’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. भालचंद्र कोरे अध्यक्षस्थानी होते. पुस्तक लिहून पूर्ण झाले आणि डॉ. पुजारी यांचा मृत्यू झाला. डॉ. पुजारी यांच्या कुटुंबीयांची विशेष उपस्थिती होती. डॉ. पुजारी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. ॲड. आप्पासाहेब इनामदार यांनी पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा सांगितली. डॉ. लवटे म्हणाले, ‘‘काही माणसे ही जगावेगळी असतात. इतरांचे दुःख कमी करणे आणि दुःखितांना आनंदी करणे हाच त्यांचा स्वभाव असतो. पुढे जाऊन हाच त्यांचा छंद बनतो. डॉ. पुजारी हे असेच आनंद वाटणारे आनंदयात्री होते.
हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पाटील यांनी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आज कालबाह्य होत चालली आहे, अशी खंत व्यक्त केली. प्रा. दिनेश डांगे म्हणाले, ‘‘डॉ. पुजारी यांनी लोकांना चालायला शिकवले. डॉ. शिरीष पटवर्धन, डॉ. संदीप श्रोत्री, ॲड. के. एस. गुंड पाटील, पी. डी. देशपांडे, भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री पाटील, तात्यासाहेब मोरे, महेंद्र दलाल आदी उपस्थित होते. विजयश्री जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रमिला बत्तासे यांनी परिचय करून दिला. अविनाश लाड यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95223 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..