राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली
राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली

राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली

sakal_logo
By

फोटो - ४९४९१
राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली
राधानगरीचे स्वयंचलित तीन दरवाजे उघडले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : जिल्ह्यात आज पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित तीन दरवाजे उघडले असून कसबा बावडा येथील राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. राधानगरी धरणातून ९४१८ क्‍युसेक विसर्ग होत असून ११ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी १८.६ फुटांपर्यंत वाढली आहे. पाण्याखाली बंधारे मार्ग वगळता रस्ता रात्री नऊपर्यंत अन्य कोणताही मार्ग वाहतुकीसाठी बंद नव्हता.
जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा आज सकाळपासून जोर वाढला. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शाहूवाडी, राधानगरी, आजरा परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित ३, ५ व ६ क्रमांकाचे एकूण तीन दरवाजे टप्प्या-टप्प्याने उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. उद्या सायंकाळपर्यंत पुराचे पाणी पात्राबाहेर येईल, अशीच परिस्थिती आहे. आणखी दोन दिवस अशाच स्वरुपाचा पाऊस असणार आहे. आज सायंकाळपर्यंत जोरदार सुरू असणाऱ्या पावसाने काही तास विश्रांती घेतली आहे.
कालपासून सुरू असलेल्या पावसाचा पिकांना दिलासा मिळाला आहे. कमी-अधिक प्रमाणात सध्या भात व भुईमुगाला पावसाची आवश्‍यकता आहे. त्यानुसार हा पाऊस जास्त असला तरीही तो काही प्रमाणात का असेना पण दिलासादायक ठरत आहे. अजून काही दिवस असाच पाऊस होत राहिला तर मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

* पाण्याखालील बंधारे :
शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, सरकारी कोगे, निळपण, वाघापूर, बिजूर भोगोली व पिळणी.

* धरणातील पाणीसाठा
धरण* एकूण पाणीसाठा टीएमसीमध्ये* रविवारचा साठा टीएमसीमध्ये
राधानगरी*८.३६* ८.३४
तुळशी*३.४७*३.४६
वारणा*३४.३९*३३.३३
कुंभी*२.७१*२.७१
पाटगाव*३.७१*३.७१

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95241 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..