घरफोडी करणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी करणारी टोळी जेरबंद
घरफोडी करणारी टोळी जेरबंद

घरफोडी करणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By

४९५७७

घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
जिल्ह्यातील सहा जणांना अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ गुन्हे उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी, दुचाकी चोरी असे गुन्हे करणाऱ्या ६ जणांना आज पोलिसांनी अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या सहा जणांकडून सेंट्रिंग प्लेट, दोन मोटारसायकल, राऊटर ब्ल्युटूथ असा सुमारे २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांनी जिल्ह्यात केलेल्या ५ गुन्ह्यांची कबुलीही दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्यांच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी पथक तयार केले. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, अंमलदार श्रीकांत मोहिते, रामचंद्र कोळी, अनमोल पवार, वैभव पाटील आणि विनोद कांबळे यांचा समावेश होता. पथकाने घरफोड्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. रेकॉर्डवरील सराईत गुन्हागारांचीही माहिती संकलित केली. तपास सुरू असताना शिरोली औद्योगिक वसाहतीमधून चोरीला गेलेल्या सेंट्रिंग प्लेट्स विकण्यासाठी काही जण शिरोलीत येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी दुचाकीवरून प्लेट घेऊन येणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले. कृष्णात प्रकाश पोतेकर (वय २३, गल्ली नं. ३ जामदार मळा, इचलकरंजी), गुरुराज मालतेश अतनुरे (२३, अष्टविनायक कॉलनी, उलपे मळा, कसबा बावडा), अक्षय विजय भोसले (२६, रामनगर, शिये), मोसीन जमीर मोमीन (२४, म्हसोबा मंदिरजवळ, रिंगरोड, लालनगर इचलकरंजी), नीलेश उर्फ सोम्या शिवाजी राऊत (२८, जाधव गल्ली, शिये), विक्रम दीपक सोनुले (२०, बालाजी कॉलनी, पाटील मळा, इचलकरंजी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सेंट्रिंगच्या प्लेट ताब्यात घेतल्या. सखोल चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यात ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. यामध्ये शिरोली येथे घरफोडी, राजारामपुरी येथे मोटारसायकल चोरी, इचलकरंजी येथे जबरी चोरी आणि शिरोळ तालुक्यात दोन घरफोड्या केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल, दुचाकी, सेंट्रिंग प्लेट, राऊटर, ब्ल्यूटुथ तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी ताब्यात घेतल्या. २ लाख १० हजारांच्या मुद्देमालाची पोलिसांनी त्यांच्याकडून वसुली केली.
कारवाईत पोलिस उपनिरीक्षक नेताजी डोंगरे, पोलिस अंमलदार आसिफ कलायगार, उत्तम सडोलीकर, संजय पडवळ, संतोष पाटील, राजेंद्र वरडेकर यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95259 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..