लेसरची डोळ्यांना इजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेसरची डोळ्यांना इजा
लेसरची डोळ्यांना इजा

लेसरची डोळ्यांना इजा

sakal_logo
By

लेसर शोचा डोळ्यांना झटका
विसर्जन मिरवणुकीचा थाट; ४० हून अधिक व्यक्तींनी घेतले खासगीत उपचार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः शहरात मोठ्या थाटामाटात निघालेल्या सार्वजनिक गणेशत्सोव मिरवणुकीत रंगीबेरंगी प्रकाश झोत (लेसर किरणे) वापरण्यात आली. त्याचे तीव्र प्रकाश झोत जास्त वेळ डोळ्यांवर गेल्याने जवळपास ४० हून अधिक व्यक्तीच्या डोळ्यांना इजा पोहचली आहे. असे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी आले आहेत. त्यामुळे लेसर किरणांची तीव्रता डोळ्यांसाठी घातक ठरत असल्याचे अधोरेखीत होत आहे.
शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. बहुतांशी मंडळांनी अजस्त्र ध्वनियंत्रणा त्यासोबत लेसर शोच्या भिंती असलेले ट्रॅक्‍टर मिरवणुकीत आणले. एका वेळी २० ते ५० बल्बमधून रंगीबेरंगी प्रकाश किरणे सोडण्यात येत होती. असे रंगीत प्रकाशझोत अंगावर डोळ्‍यावर घेत कार्यकर्ते नृत्य करीत होते. सायंकाळी सहापासून दुसऱ्या दिवशी सहापर्यंत जवळपास बारा तास लेसर शोचा झगमगाट होता. मिरवणूक पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी झाली, अनेकजण रस्त्याकडेला थांबून मिरवणूक पाहत होते.
या काळात ज्यांच्या डोळ्यांची आरोग्य स्थिती कमकुवत आहे. अशांच्या डोळ्यांवर लेसरचा विपरित परिणाम झाला. मिरवणूकीतून बाहेर आल्यानंतर काही वेळातच डोळ्यांना त्रास होऊ लागल्याच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण खासगी नेत्र उपचार तज्ञांकडे उपचाराला आले आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.


लेसर किरणांच्या तीव्रतेमुळे डोळ्यातील बुबुळाचा नाजूक भाग होरपळतो. चरचर होते, डोळ्यांतून पाणी येते, डोळे कोरडे होऊन काही वेळा रक्तस्त्राव होतो. डोळ्याच्या मुख्य भागावरही परिणाम होतो. असे रुग्ण खासगी नेत्रोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येत आहेत. उपचाराने हे रुग्ण बरे होतील मात्र लेसरची तीव्रता थेट डोळ्यांवर घेणे हानिकारक ठरू शकते. त्यासाठी गॉगल वापरणे किंवा लेसरची किरणे डोळ्यांवर येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. सुजाता वैराट, नेत्रउपचारतज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95260 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..