मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट बातमी
मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट बातमी

मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट बातमी

sakal_logo
By

विसर्जन मिरवणुकीत
२२ मोबाईल चोरीला
२ दुचाकींची चोरी, सीसीटीव्हीवरून तपास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः गणेश विसर्जन मिरवणुकीत तब्बल २२ मोबाईल चोरीला गेले. तर २ दुचाकीही चोरट्यांनी पळवल्या. याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. हे मोबाईल नक्की चोरीला गेले की गहाळ झाले हे तपासानंतरच लक्षात येईल.
कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी शहरात गणेश विसर्जन मिरवणूक झाली. याचा आनंद नागरिकांनी घेतलाच पण चोरट्यांनाही याचा लाभ झाल्याचे दिसून आले. या मिरवणुकीत तब्बल २२ मोबाईल चोरीला गेले. तर ताराबाई रोड आणि भाऊसिंगजी रोड वरून दोन दुचाकी चोरीला गेल्या. भाऊसिंगजी रोडवरील दुचाकी तीन जण घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यावरून पोलिस तपास करत आहेत. मिरवणुकीत आणखी किती चोऱ्या झाल्या हे तपासानंतर समोर येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95276 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..