शेतकरी मतदानापासून राहणार वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी मतदानापासून राहणार वंचित
शेतकरी मतदानापासून राहणार वंचित

शेतकरी मतदानापासून राहणार वंचित

sakal_logo
By

मतदानापासून शेतकरी वंचित
कृषी उत्पन्न बाजार समिती; राज्य सरकारकडून निर्णय स्थगित
जयसिंगपूर, ता. ११ : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय मागे घेतल्याने शेतकरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकरी मतदानाला प्राप्त ठरणार असल्याची घोषणा केली होती. अशातच बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. यात शेतकरी मतदाराला बाजूला ठेवून पूर्वीप्रमाणे निवडणुका होणार आहेत.
जयसिंगपूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे शिरोळ तालुका असून, यात अठरा जागा निवडून द्यावयाच्या आहेत. यात सेवा सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल व तोलाई यांचे २८०० मतदार आहेत. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीचे ६६३ सदस्य, तालुक्यातील १५१ सेवा सोसायट्यांचे १७०७ संचालक, अडते व व्यापारी प्रतिनिधी ३४१, तर हमाल व तोलाई ८९, असे २ हजार ८०० मतदार आहेत. बाजार समितीसाठी विकास सेवा सोसायट्यांतून ११ जागा निवडून द्यायच्या असून, यात ७ सर्वसाधारण, २ महिला, १ भटक्या जाती व विमुक्त जाती-जमाती, १ ओबीसी. ग्रामपंचायतीतून ४ जागा निवडून द्यायच्या आहेत. सहकारी व्यापारी मतदार रद्द झाल्याने आता होणारी निवडणूक ही १८ जागांसाठी होणार आहे.
गत निवडणुकीत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेना अशी लढत झाली होती. यात भाजपला एकही जागा मिळवता आली नव्हती. सध्या तालुक्यातील राजकीय घडामोडी बदलल्या असल्याने नवे चित्र पहायला मिळणार आहे. यड्रावकर गट, भाजप विरुद्ध काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेना अशी आघाडी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95277 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..