अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
इचलकरंजीत शुक्रवारी आयोजन; पालक-शिक्षक संघाचा उपक्रम
इचलकरंजी, ता.१२ ः अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटीचा निकाल १५ सप्टेंबरपर्यंत लागणार आहे. त्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रियाही सुरू होणार आहे. त्यामुळे येथील पालक शिक्षक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मिशन ई अॅडमिशन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे शुक्रवारी (ता.१६) दुपारी अडीच वाजता होणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीच्या विविध कॉलेजेस आणि शाखांविषयी माहिती दिली जाणार आहे. तसेच इंनटेक आणि कट-ऑफसविषयी कल्पना मिळेल. प्रवेश प्रक्रियेतील रजिस्ट्रेशनपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंच्या सर्व स्तरांविषयी सविस्तर आणि अद्ययावत मार्गदर्शनही केले जाईल. या अनुषंगाने महत्त्वाची व उपयुक्त माहितीसह अनेक कॉलेजेस आणि शाखांच्या मागील वर्षाच्या कट-ऑफस् पुस्तिका उपस्थित विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. कार्यक्रमात परिसरातील ९ अभियांत्रिकी महाविद्यालये सहभागी होऊन त्यांच्याविषयी माहिती देणार आहेत. कार्यक्रमानंतरही विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी व्यंकटराव हायस्कूल येथे वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डी. एम्. कस्तुरे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95290 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..