दिव्यांग ओळखपत्र नोंदणी, तपासणीकडे पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग ओळखपत्र नोंदणी, तपासणीकडे पाठ
दिव्यांग ओळखपत्र नोंदणी, तपासणीकडे पाठ

दिव्यांग ओळखपत्र नोंदणी, तपासणीकडे पाठ

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

अपंग खूर्ची लोगो


बनावट दिव्यांगांचे धाबे दणाणले
वैश्‍विक ओळखपत्र देण्याचा निर्णय; ओळखपत्र नोंदणी, तपासणीकडे पाठ
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १२ : शासनाकडून दिव्यांगांना विविध सवलती दिल्या जातात; मात्र त्यांची एकत्रित माहिती संकलन होत नाही. म्‍हणूनच सर्व दिव्यांगांना एकच वैश्‍विक ओळखपत्र देण्याचा निर्णय, शासनाने घेतला आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढलेले नाही, त्यांच्यासह ज्यांचे प्रमाणपत्र आहे, अशा दिव्यांगांनाही वैश्‍विक ओळखपत्र काढावे लागणार आहे. मात्र सरकारी सेवेत दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणाऱ्यांचे मात्र या निर्णयाने धाबे दणाणले आहेत. नव्याने ओळखपत्र घेताना पुन्‍हा आरोग्य तपासणी होणार आहे. तपासणीत अडकू नये, यासाठी अनेकांनी या मोहिमेकडेच पाठ फिरवल्याची चर्चा सरकारी कार्यालयांत सुरू आहे.
एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३ टक्‍के लोक हे दिव्यांग वर्गवारीत येतात. मात्र जिल्‍ह्याचा विचार करता अजूनही दिव्यांग नोंदणी होताना दिसत नाही. परिणामी नोंदणी नसणारे दिव्यांग हे शासनाच्या लाभापासून वंचित राहतात. दिव्यांगांच्या त्यांच्या दिव्यंगत्‍वाच्या टक्‍केवारीनुसार नोकरीपासून, बदली, बढती, प्रवासापर्यंत अनेक सवलती दिल्या जातात. मात्र खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकऱ्या‍ लाटण्याचे प्रकारही सुरू आहेत. बनावट दिव्यांगांमुळे खऱ्या‍खुऱ्या‍ दिव्यांगांवर अन्याय होत आहे. त्यामुळेच शासनाकडून वैश्‍विक ओळखपत्र देण्याच्या निर्णयाचे स्‍वागत केले जात आहे. आरोग्य तपासणीत चुकीचे प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांना मेडिकल बोर्डकडे पाठवावे, चुकीचे प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.
....
दृष्‍टिक्षेपात
*जिल्‍ह्यात आजअखेर दिव्यांग संख्या- ४६ हजार १५७
*तयार ओळखपत्र संख्या - २५ हजार ९१२
*वाटप ओळखपत्रांची संख्या -२२ हजार ५०३
*वैद्यकीय तपासणीसाठी प्रलंबित - १० हजार ८५२
...
सर्वाधिक संशय कर्णबधिर प्रमाणपत्रांवर
शासकीय सेवेत कर्णबधिर प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकांनी फिक्‍सिंग करून हे प्रमाणपत्र मिळवले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध योजनांचा लाभही घेतला आहे. मात्र वैश्‍विक ओळखपत्रासाठी पुन्हा‍ कानाची तपासणी करावी लागणार असल्याने, अशा कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले तर करायचे काय?, असा त्यांना प्रश्‍‍न पडला आहे.
...
ाशासनाने दिव्यांगांना वैश्‍विक ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी जिल्‍हास्‍तरावर पाच डॉक्‍टरांचे पथक तयार केले असून सर्व माहिती ऑनलाईन करण्यासाठीही मनुष्यबळ उपलब्‍ध केले आहे. मात्र शासनाच्या सेवेतच असलेले काही लोक चालढकल करत असल्याचे सांगण्यात येते. काही संस्‍था, संघटना या तर संबंधितांना मेडिकल बोर्डकडे पाठवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जिल्‍ह्यातील सर्व दिव्यांगांनी व प्रमाणपत्र प्राप्‍त असणाऱ्यांनी वैश्‍विक ओळखपत्र काढून घ्यावे.
-दीपक घाटे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95316 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..