गडहिंग्लजला फिल्म क्लब, चिल्लर पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला फिल्म क्लब, चिल्लर पार्टी
गडहिंग्लजला फिल्म क्लब, चिल्लर पार्टी

गडहिंग्लजला फिल्म क्लब, चिल्लर पार्टी

sakal_logo
By

गडहिंग्लजला फिल्म क्लब, चिल्लर पार्टी
कला अकादमी-पालिकेचा पुढाकार; वैचारिक शक्तीला चालना देण्यासाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील नगरपरिषद व कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने मोठ्यांसाठी गडहिंग्लज फिल्म क्लब आणि चिमुकल्यांसाठी चिल्लर पार्टीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित घटकांना कला अकादमीच्या भडगाव रोडवरील हॉलमध्ये मोफत वेगवेगळे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. वैचारिक शक्तीला चालना देण्यासह नाट्य चळवळीला बळकटी देण्याच्या हेतूने हा नवा उपक्रम सुरू केल्याची माहिती कला अकादमीचे संस्थापक प्रा. शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. पाटील म्हणाले, ‘‘फिल्म क्लब उपक्रमातंर्गत विविध भाषेतील जागतिक चित्रपट दाखवले जातील. पुरस्कारप्राप्त शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर कलाकार, दिग्दर्शक यांच्याशी गप्पांद्वारे चर्चासत्र आयोजण्यात येईल. दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मोठ्यांसाठी चित्रपट दाखविले जातील. गडहिंग्लज, आजरा, चंदगड व इतर भागातील कलाकारांनी शॉर्ट फिल्म तयार केली असेल तर त्याच्या स्क्रिनिंगसाठी कला अकादमीशी संपर्क साधावा. फिल्म क्लबमधून प्रदर्शित करावयाच्या चित्रपटांची निवड डॉ. नीलेश शेळके, योगेश शहा, सोमदत्त देसाई, जगदीश पाटील, डॉ. डी. जी. चिघळीकर यांची कोअर कमिटी करेल.’’
चिल्लर पार्टी उपक्रमातून पालिका शाळांसह इतर विद्यार्थ्यांसाठीही मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील बाल चित्रपट दाखविण्यात येतील. प्रत्येक महिन्याच्या दर शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यासाठी पूर्वी न पाहिलेले चित्रपटांची निवड केली जाईल. बालचित्रपटातून मुलांची वैचारिक शक्ती वाढीस चालना मिळणार आहे. चिल्लर पार्टीसाठी कोल्हापूरचे मिलिंद यादव यांचे सहकार्य आहे. डॉ. शेळके, संतोष देसाई, अवधूत पाटील, संतोष आंबी, अरुण पाटील यांची कोअर कमिटी बालचित्रपटांची निवड करेल. कला अकादमीच्या हॉलमध्ये ७० ते ८० प्रेक्षकांची क्षमता आहे. यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रतिसाद वाढत गेल्यास भविष्यात वेगळ्या नियोजनाची तयारीही केली आहे. या वेळी डॉ. शेळके, डॉ. चिघळीकर, उर्मिला कदम उपस्थित होते.

चौकट
दुर्गम शाळांतही उपक्रम
ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांना गडहिंग्लजमध्ये येऊन चित्रपट पाहणे अशक्य आहे, अशा दुर्गम शाळांमध्ये कला अकादमीची टिम जावून चित्रपट दाखवणार आहे. एक उपक्रम म्हणून अशा शाळांसाठी विशेष नियोजन केल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95330 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..