डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प

sakal_logo
By

49667
-------------
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रकल्प
ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सरीची निर्मिती; पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपयुक्त

इचलकरंजी, ता. १२ ः येथील डीकेटीईच्या इटीसी विभागातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या प्राजक्ता कोळेकर, ॠतुजा माळी व स्नेहा कोकणे या विद्यार्थिनींनी ‘ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सरी मशीन’ हा प्रकल्प बनवला आहे. देशातील कमी होत चाललेले पाण्याचे स्त्रोत, पावसाची अनियमितता, त्यामुळे भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई या बाबी लक्षात घेऊन ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सरी व इंटरनेट ऑफ थिंग यांची सांगड घालून हा प्रकल्प बनवला आहे.
मशीनला जोडलेली पाण्याची टाकी व त्यामधील शिल्लक पाण्याची पातळी पाहण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंगची कार्यप्रणाली वापरली. मशीन टाकीच्या ठिकाणी बसवली तर टाकीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे, हे त्वरित संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर पाहता येते. तसेच पंप बंद किंवा चालूही करता येतात. विद्यार्थ्यांनी थंड तसेच गरम पाणी देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. हे मशीन अद्ययावत मायक्रो कंट्रोलर, सेन्सर्स या तंत्रज्ञानावर कार्यरत आहे.
पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी या प्रकल्पामध्ये स्वयंचलित नळ बसवलेले आहेत. जे मशीनवर दिलेल्या बटनाद्वारे काम करतात. किती लिटर गरम किंवा थंड पाणी हवे आहे, यासाठी बटन दिलेले आहे. दिलेल्या प्रमाणानुसार मशीनद्वारे दोन वेगवेगळया तोटीमधून गरम किंवा थंड पाणी उपलब्ध होते. व ते बंदही केले जाते. बटनद्वारे पाणी किती लिटर सेट केले व त्यानुसार किती लिटर येणे बाकी आहे याची माहिती मशीनवर दिलेल्या डिस्प्लेवर दिसते. अशा विविध सुविधा या मशिनवर उपलब्ध आहेत.
संशोधनासाठी विद्यार्थिनींना डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे व विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील यांचे मागदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95386 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..