फुलेवाडी-बालिंगा रस्ता आणखी किती बळी घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलेवाडी-बालिंगा रस्ता आणखी किती बळी घेणार
फुलेवाडी-बालिंगा रस्ता आणखी किती बळी घेणार

फुलेवाडी-बालिंगा रस्ता आणखी किती बळी घेणार

sakal_logo
By

फुलेवाडी-बालिंगा रस्ता मृत्यूचा सापळा
खड्ड्यांमुळे दुरवस्था; शासनाचे दुर्लक्ष, दीड महिन्यात तीन तरुणांचा बळी

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
बालिंगा, ता. १२ : अरुंद आणि मोठमोठे खड्डे असणाऱ्या फुलेवाडी ते बालिंगा दरम्यानच्या कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याने एका वर्षात एक-दोन नव्हे, तर आठ ते दहा जणांचा बळी घेतला आहे. जेवढा हा रस्ता खड्ड्याने भरला आहे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हॉटेलचे फलक, बेकरी, फळे व भाज्यांच्या गाड्यांनी हा महामार्गाला व्यापले आहे. रस्ता रुंदीकरण किंवा चौपदरीकरणासाठी कोणतीही हालचाल नसल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यासाठी १३८ कोटी रुपये मंजूर झाले. रस्ता लवकरच सुरू होणार, सर्वेक्षण सुरू झाले, असे ऐकिवात होते. महाविकास आघाडी सरकार असताना हा रस्ता होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सरकार गेले आणि रस्ता तसाच राहिला. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर याला गती मिळून लोकांना आणि वाहतूकदारांना जीवघेणा ठरणारा रस्ता पूर्ण होईल, अशी चर्चा आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. दीड महिन्यापूर्वी रस्त्यातील खड्डे चुकविताना एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर आठवड्यापूर्वी चिंचवडे येथील २१ वर्षीय युवकाचा याच रस्त्यावर अपघाताने मृत्यू झाला. हा रस्ता नव्हे, मृत्यूचा सापळा बनला आहे. मुसळधार पावसामुळे डांबर आणि खडी वाहून गेली आहे. आता खड्डेच खड्डे उरले आहेत. याचे कोणालाही गांभीर्य नाही. मात्र अपघातामुळे ज्या घरातील तरुण गेले, त्या घरातील परिस्थिती बिकट आहे.
आधी रस्त्यात खड्डे पडले आहेत, त्यातच फुलेवाडी भगवा चौक-बालिंगा ते नागदेववाडीपर्यंत अतिक्रमण वाढले आहे. हॉटेल, बेकरी व्यावसायिकांनी फलक रस्त्यात लावले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहन घरते आणि अतिक्रमणामुळे वाहने चालविता येत नाहीत. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन रस्ता दुरुस्तीवर किंवा चौपदरीकरणावर भर दिला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

फुलेवाडी ते बालिंगादरम्यानच्या रस्त्यावर दोन महिन्यात तिघा तरुणांचा मृत्यू झाला आहे. चूक कोणाची यापेक्षा रस्त्यावरील खड्डे चुकविताना अपघात झाल्याचे वारंवार सांगितले जाते. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करावी, तरच त्यांना याचे गांभीर्य लक्षात येणार आहे.
- शुभम पाटील, वाहतूकदार.
..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95402 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..