स पटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स पटा
स पटा

स पटा

sakal_logo
By

वरदायिनी गृहनिर्माण संस्थेचा वर्धापन दिन
कोडोली ः येथील वरदायिनी गृहनिर्माण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पारदर्शी कारभार व सभासदांच्या हिताच्या विचाराने प्रामाणिक कारभार करणारी संस्था म्हणून संस्था उदयास येत असल्याचे मत संस्थाध्यक्ष बबन केकरे यांनी सांगितले. वर्धापनदिनानिमित्त संस्थेत पूजा घालण्यात आली.
उपाध्यक्ष प्रताप राबाडे यांनी स्वागत केले. यावेळी पुंडलिक नलवडे, नितीन मानकर, संजय राबाडे, शैलेश लाड, रामराव बच्चे, बाबासो पाटील, विश्वास पाटील, विवेक देशपांडे, संजय नलवडे, अनिल मोरे, नंदकुमार जाधव, महेश जाधव आदी उपस्थित होते. सचिव चंद्रकांत किबिले यांनी आभार मानले.


रेखा येलकर पैठणीच्या मानकरी
सेनापती कापशी : हसूर बुद्रुक (ता. कागल) येथील गणेश मंडळाच्या होममिनिस्टर स्पर्धेत रेखा सचिन येलकर प्रथम क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. यावेळी मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे प्रमुख उपस्थित होते. मदन पलंगे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेत लता नामदेव भोसले, पूनम मगदूम या उपविजेत्या ठरल्या. उपविजेत्या तसेच सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित केले. मंडळाचे अध्यक्ष आणि उपसरपंच पुरुषोत्तम साळोखे यांनी स्वागत केले. स्वप्नील मोरे, नारायण देसाई, राहुल देसाई आदी उपस्थित होते.


बुरंबाळी शाळेत साहित्य वाटप
धामोड : बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील शाळेत माजी सरपंच अनिल आरडेकर व स्वप्नील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष दीपाली कानकेकर, उपाध्यक्ष संजय पाटील, लता आरडेकर, मुख्याध्यापक संजय सुतार, माधुरी चव्हाण, मनोहर चौगुले, बबन पाटील, शारदा मगदूम, मालूबाई पाटील, के. बी. चौगुले, जयराम चौगुले, अनिरुद्ध पाटील, प्रथमेश पाटील, प्रीतम आरडेकर उपस्थित होते.

01992
अध्यक्षपदी निवास पाटील
कसबा बीड ः कोगे (ता. करवीर) येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवास दादू पाटील यांची निवड झाली. यावेळी सरपंच आंबूबाई पाटील, उपसरपंच बाजीराव निकम, सदस्य विश्वास पाटील सर्व सदस्य, गणपती मिठारी, पोलिसपाटील दत्तात्रय मिठारी आदी उपस्थित होते. त्यांना कुंभी-कासारी साखर कारखान्यांचे संचालक प्रकाश पाटील व भगवान पाटील यांचे सहकार्य लाभले.

दीक्षांत कांबळेचे उपकरण प्रथम
मलकापूर ः जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूरतर्फे कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटामधून मलकापूर हायस्कूलची दीक्षांत दिनेश कांबळे (१० वी ) याच्या ‘मल्टिपर्पज रोबोट’ उपकरणाचा प्रथम क्रमांक मिळाला. त्याच्या या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. विज्ञान शिक्षक एन. एस. कदम, डी. बी. कोडोलकर, व्ही. एस. शेळके, एच. बी. प्रधान यांनी मार्गदर्शन केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही विद्यार्थी व शिक्षकांनी घवघवीत यश मिळविले. गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव, मुख्याध्यापक विजय साठे, पर्यवेक्षक एस. व्ही. कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

03226
प्रज्वल पाटीलचे नीट परीक्षेत यश
पुनाळ : पुशिरे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथील प्रज्वल रणजित पाटील याने नीट परीक्षेत यश मिळवले. येथील बाळासाहेब बाडे फाउंडेशन संचालित ज्योतिर्लिंग ज्युनिअर कॉलेजचा तो विद्यार्थी आहे. त्याला ७२० पैकी ६५७ गुण मिळाले. शासकीय एमबीबीएस कॉलेजसाठी तो पात्र झाला. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सरदार बाडे यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला. यावेळी प्राचार्य राहुल बाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

उदय पतसंस्थेची सर्वसाधारण सभा
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील उदय सहकारी पतसंस्थेची ३८ वी सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी एम. एम. पाटील होते. सागर साळोखे यांनी प्रास्ताविक केले. सचिव चंद्रकांत पाटील यांनी अहवालवाचन केले. विषयपत्रिकेवरील विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी सभासदांचे शेअर्स रक्कम वाढविण्याचा निर्णय घेणे, थकीत कर्ज दारांची वसुली करणे, संस्थेच्या ठेवी विविध बॅंकेत ठेवी वाढण्याबाबत चर्चा केली. चर्चेत बापुसो शिंदे, संजय खवरे, केशव घाटगे, राजेंद्र तासे, परशराम खुडे, नायकू खवरे, सरदार शेवाळे, युवराज कांबळे आदींनी भाग घेतला. संचालक शाहीर कांबळे, तानाजी खुडे, बळवंत शेवाळे, सदाशिव घाटगे, दगडू साळोखे, शिवाजी चौगुले, सागर खवरे-पाटील, सागर चेचर आदी उपस्थित होते. सर्जेराव धनगर यांनी आभार मानले.

केळोशी बुद्रुक येथे रक्तदान शिबिर
धामोड : केळोशी बुद्रुकपैकी सुतारवाडी (ता. राधानगरी) येथे रंगराव संतू चव्हाण यांची पुण्यतिथी व केतन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झाले. संजीवन ब्लड बँकेमार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी ५५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना डबा व रक्तदान लोगो टी-शर्ट देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, संदीप मगर, भगतसिंग नवने, सागर धुंदरे उपस्थित होते.

मसाईदेवी पाणी संस्थेची सभा
पोर्ले तर्फ ठाणे ः येथील मसाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री मसाईदवी मंगल कार्यालयात झाली.अध्यक्षस्थानी अध्यक्ष रामचंद्र खुडे होते.अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सचिव मधुकर लोंढे यांनी अहवालवाचन केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली. थकबाकी व पाझरणाऱ्या भरून सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष रामचंद्र खुडे यांनी केले. मृत सभासदांच्या वारसांना सभासद करून घेण्याचा ठराव केला. चर्चेत सागर साळोखे, तानाजी खुडे, राजाराम घाटगे, वसंत खवरे, नारायण पाटील, कृष्णात आंबले आदींनी भाग घेतला. यावेळी शहाजी खुडे, सदाशिव घाटगे, नायकू शेवाळे, आनंद सिध्द, संजय साळोखे, सुरेश घाटगे, शंकर गवळी, पंडित खवरे, सदाशिव कुंभार आदी उपस्थित होते. सरदार शेवाळे यांनी आभार मानले.

लक्ष्मीनारायण हायस्कूलमध्ये
माजी विद्यार्थ्यांकडून वस्तू भेट
राशिवडे बुद्रुक : पुंगाव (ता. राधानगरी) येथील लक्ष्मीनारायण हायस्कूलमध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उपयोगी वस्तू गुरुदक्षिणा भेट दिल्या.
प्रशांत शिवाजी कुलकर्णी यांनी गुरुदक्षिणा म्हणून वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला एलसीडी स्मार्ट टीव्ही प्रदान केला. त्यांच्या आई राजश्री कुलकर्णी यांच्या हस्ते त्याचे अनावरण केले. पांडुरंग राजाराम उणे यांनी आईंच्या स्मरणार्थ शाळेस लोखंडी तिजोरी भेट दिली. पांडुरंग गणपती पाटोळे यांनी वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाला नेत्यांचे दहा फोटो भेट दिले. हा प्रदान सोहळा शाळेत झाला. एन. आर. पाटील यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या सहसचिव आक्काताई बापूसो पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. व्ही. एस. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95404 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..