बेसिक मजुरी २० पैसे करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेसिक मजुरी २० पैसे करा
बेसिक मजुरी २० पैसे करा

बेसिक मजुरी २० पैसे करा

sakal_logo
By

49708
-------
बेसिक मजुरी २० पैसे करा
रॅपिअर अॅटोलूमधारकांची मागणी ः दलालांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा आग्रह

इचलकरंजी, ता. १२ ः बेसिक मजुरी १८ पैशांवरून २० पैसे करण्याची मागणी रॅपिअर अॅटोलूम कारखानदारांनी केली आहे. याबाबतचे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांना दिले. या प्रक्रियेतील दलालांची संख्याही मर्यादित करण्याची मागणी यावेळी केली.
असोसिएशनने शहरातील रॅपिअर अॅटोलूम कारखानदारांना संघटित करून त्यांची बेसिक मजुरी १८ पैसे केली होती. मात्र, महावितरणने जून महिन्यापासून इंधन समायोजन शुल्कमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. यामुळे प्रतियुनिट १ ते १.२० रुपयांनी वीज बिले वाढलेली आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात प्रतिपीक २ पैशांची वाढ होत आहे. त्यामुळे आता १८ पैसे प्रतिपीक मजुरीऐवजी २० पैसे प्रतिपीक केल्यास वाढीव उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालता येणे शक्य आहे, असे स्पष्ट करीत या वाढीव मजुरीची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी मागणी यावेळी केली.
रॅपिअर अॅटोलूम उद्योगामध्ये मजुरीने बिमे विणण्याचे काम देणाऱ्या दलालांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त झालेली आहे. हे दलाल मनमानी पद्धतीने याबाबतचे सौदे करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असोसिएशनने ठरावीकच अधिकृत दलाल नियुक्त करावेत व त्यांची नोंदणी करून त्यांना असोसिएशनचे कॉन्ट्रॅक्ट बुक द्यावेत, अशी मागणी रॅपिअर कारखानदारांनी केली. यावेळी चंद्रकांत पाटील, सुकुमार देवमोरे, श्रीशैल पाटील, शीतल पाटील, कृष्णात सातपुते, अतुल शेळके, विजयकुमार पाटणी, सचिन हावले, विक्रांत सावंत, प्रसाद भोपळे, चेतन चव्हाण, विजय पाटील, अजय मगदूम आदी उपस्थित होते.
---------
दृष्टिक्षेप
* रॅपिअर अॅटोलूमधारक संख्या - १०० ते १२५
* रॅपिअर अॅटोलूम संख्या - ३ हजार ते ४ हजार
* उत्पादित कापड प्रकार - डिझाईन शूटिंग व शर्टिंग
----------
वीज दरवाढीमुळे रॅपिअर अॅटोलूम कारखानदारांच्या मजुरीत वाढ होणे आश्यक आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मजुरीत वाढ जाहीर करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार दसऱ्यापर्यंत बैठक घेऊन याबाबतची घोषणा करण्याचे नियोजन सुरू आहे.
- सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95445 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..