पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके
पत्रके

पत्रके

sakal_logo
By

49735
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय चिटणीस संतोष कणसे यांना निवेदन देताना सभेचे सर्व उपस्थित मान्यवर.

‘समाजवादी शिक्षण हक्क’तर्फे
जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर : अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेमार्फत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस संतोष कणसे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनातर्फे विनंती करावी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये तीन ते सहा वयोगटांतील बालकांना शिक्षण हक्क कायद्यात समाविष्ट केले आहे. १४ ते १८ वयोगटांतील मुलांनाही मोफत शिक्षण मिळावे, या सुधारित शैक्षणिक धोरणाचा समावेश सक्तीच्या आणि मोफत शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये करावा. त्यामुळे वय वर्षे तीन ते १८ वयोगटांतील सर्व मुला-मुलींना मोफत शिक्षण हक्काचा लाभ मिळेल. यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ ची तत्काळ सुधारणा करावी. यावेळी सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम. एस. पाटोळे, हसन देसाई, सचिव हेमलता पाटील, सदस्य भरत लाटकर, अशोक चौगुले, शामराव कांबळे, रिटा रॉड्रिग्ज, विजय भोगम, अरुण कांबळे, राजेश वरक, बाबासाहेब डोणे, सतीश कांजर, जगन्नाथ कांदळकर, हिंदुराव सुतार, रवींद्र उदाळे आदी उपस्थित होते.

आचार्य विनोबा भावे यांना अभिवादन
कोल्हापूर : जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक वारस संघटनेतर्फे महात्मा गांधी प्रार्थना हॉलमध्ये अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. प्राचार्य व्ही. डी. माने अध्यक्षस्थानी होते. प्रा. सदाशिव मनुगडे, सविता देसाई, गीताताई गुरव, छायाताई भोसले, शांताताई पाटील, प्रा. डी. डी. चौगुले आदींनी आचार्य विनोबांच्या भूदान चळवळीची माहीती दिली. प्रा. मनुगडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रकाश चौगुले यांनी आभार मानले.

एनसीसीतर्फे मुलींचे प्रशिक्षण शिबिर
कोल्हापूर : एनसीसी निदेशालय यांच्यातर्फे गटमुख्यालय कोल्हापूरअंतर्गत राष्ट्रीय छात्रसेना एनसीसीमार्फत राज्यस्तरावरील आयजीसी/टीएससी मुलींचे प्रशिक्षण शिबिर ४० झाले. महाराष्ट्रातील सात गट मुख्यालयातील कोल्हापूर, पुणे, मुंबई ‘ए’, मुंबई ‘बी’, अमरावती, नागपूर, औरंगाबाद येथील २८० छात्र मुलींनी भाग घेतला. याअंतर्गत विविध सत्रांत फायरिंग, नकाशा वाचन, तंबू उभारणी, स्वच्छता आणि आरोग्य, जेडीएफएस स्पर्धा घेण्यात आल्या. लेखी आणि तोंडी परीक्षा घेऊन ३९ छात्र मुलींची राज्य एनसीसी निदेशालयासाठी निवड करण्यात आली. कोल्हापूर गट मुख्यालयाकडील २२ छात्र मुलींचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथे १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्पमध्ये या छात्र मुली सहभागी होणार आहेत. कॅप्टन सुनिता भोसले आदी उपस्थित होते. गट मुख्यालयाचे ग्रुप कमांडर, ब्रिगेडिअर समीर साळुंके, डेप्युटी ग्रुप कमांडर कर्नल विशाल गौरव, ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल समीर मोहिते आदींचे सहकार्य लाभले.


शाहू कॉलेजमध्ये ग्रंथ प्रदर्शन
कोल्हापूर : शिक्षक पर्वनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये इन्फोटेनमेंट क्लब, ग्रंथालयातर्फे स्क्रीनिंग ऑफ एज्युकेशनल फिल्म, ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. डॉ. रणदिवे महेश यांनी ग्रंथ वाचन कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. ग्रंथ प्रदर्शनामध्ये समाज सुधारक, शैक्षणिक माहितीची पुस्तके, विविध संदर्भ साधने, स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मांडणी केली होती. कर्मवीरांच्या कथा, शाहूंच्या आठवणी, ध्रुवाचा तारा, ययाती या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. डॉ. बी. बी. घुरके यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, उपप्राचार्या डॉ. सिंधू आवळे, डॉ. शकील शेख, ग्रंथपाल एस. टी. लोखंडे, डॉ. एम. आर. राजमाने आदी उपस्थित होते.

49725
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संस्थेच्या सभेत उपस्थित कर्मचारी.

मनपा सेवानिवृत्तांच्या संस्थेची सभा
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सेवानिवृत्त (पेन्शनर) कर्मचाऱ्यांच्या संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सचिव मदन भोसले यांनी अहवालाचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. संचालक प्रकाश खोत यांनी पेन्शनरांचे स्वागत केले. संस्थापक रा. तु. पाटील, बाळ डोकरे यांच्या प्रतिमेस व्यंकाप्पा भोसले, बाळासो मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. श्री. लोखंडे यांनी ज्येष्ठ पेन्शनरांचा सत्कार केला. यात मोहन सातारकर, सुरेश बडवे, निवृत्ती भांदिगरे, अशोक वाकरेकर, श्रीमती जयश्री पोवार यांचा समावेश होता. संचालक बाबूराव पोवार, नामदेव पाटील, रंगराव कांबळे, जयेश भोसले, जयवंत गोंडाळे आदी उपस्थित होते.


फोर व्हीलर असोसिएशनतर्फे आवाहन
कोल्हापूर : जिल्हा फोर व्हीलर वर्कशॉप ओनर वेल्फेअर असोसिएशन आणि रिसर्च फाऊंडेशनतर्फे अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १३) श्री गणपतीपुळे येथे फोर व्हीलर वाहनांची दुरुस्ती सेवा देण्यात येईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष योगेश पाटील यांनी पत्रकाद्वारे केले. ही दुरुस्ती सेवा श्री गणपतीपुळे, हॉटेल विसावा, चाफे तिठ्ठा, रत्नागिरी तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे पार्किंग ठिकाणी देण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95448 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..