आजरा नगरपंचायतीस पाच वर्ष पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा नगरपंचायतीस पाच वर्ष पूर्ण
आजरा नगरपंचायतीस पाच वर्ष पूर्ण

आजरा नगरपंचायतीस पाच वर्ष पूर्ण

sakal_logo
By

आजरा नगरपंचायत
स्थापनेस पाच वर्षे पूर्ण
१५ कोटीची विकास कामे; ४० कोटींची कामे प्रस्तावित
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १२ : आजरा नगरपंचायत स्थापनेस पाच वर्षे पूर्ण झाली असून नगरपंचायतीने पाच वर्षात १५ कोटींची विविध विकास कामे केली आहेत. ४० कोटींची प्रस्तावित कामे आहेत. ही कामे देखील मार्गस्थ लागतील, अशी माहिती देण्यात आली.
नगरपंचायत स्थापन होवून पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत शहरात राबविलेल्या विविध विकास कामांचा आढावा नगराध्यक्षा चराटी व नगरसेवकांनी घेतला.
नगरसेवक विलास नाईक यांनी स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते (कै) काशिनाथ चराटी यांच्या काळात नगरपंचायतीसाठी प्रयत्न सुरु झाले. १३ सप्टेंबर २०१७ ला याला मुर्तुस्वरुप मिळाले. अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख व नेते अशोक चराटी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे नगरपंचायत स्थापन झाली. याला तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांचे सहकार्य मिळाले. नगरपंचायत झाल्यामुळे शहरातील विकास कामे झपाट्याने मार्गी लागण्यास मदत झाली. ग्रामपंचायतीच्याकाळात निधीमिळण्यास मर्यादा होत्या. नगरपंचायतीमुळे विकासकामांसाठी भरीव प्रमाणात विकास निधी मिळत आहे.’’ नगरसेवक किरण कांबळे म्हणाले, ‘‘सन १८-१९ ची पुरपरिस्थिती व त्यानंतर आलेला कोरोना यामुळे तीन वर्षात विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळाला नाही. पण या दोन वर्षात शहरातील रस्ते व गटारीसाठी नऊ कोटी रुपये खर्च केले आहेत. सौरउर्जेसाठी खासदार संजय मंडलिक यांच्याकडून एक कोटीचा निधी मिळाला आहे. आमदार सतेज पाटील यांनी रुग्णवाहिका, फायर बुलेट व अग्निशमन वाहनासाठी निधी दिला आहे. त्याचबरोबर स्थानिक आमदार प्रकाश आबिटकर व अन्य जिल्हा नियोजन मंडळातून विकासकामांसाठी निधी मिळाला. त्यामुळे पंधरा कोटीची विकासकामे झाली आहेत.’’ शहराची पाणी पुरवठा योजनेसाठी ३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अन्य विकासकामांठी निधी मिळाला असून प्रस्तावित ४० कोटींची विकास कामे आहेत. स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये आजरा नगरपंचायतीचे नामांकन झाले आहे. माझी वसुंधरामध्ये आजरा नगरपंचायतीचा १८ वा क्रमांक आला.’’ पाच वर्षात जनतेच्या हिताला प्राधान्य देवून काम झाल्याचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी यांनी सांगितले. या वेळी नगरसेवक संभाजी पाटील, अस्मिता जाधव, यासीराबी लमतुरे, शकुंतला सलामवाडे, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, प्रशासन अधिकारी राकेश चौगले आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95508 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..