स्‍वयंअर्थसहाय्‍यित शाळा प्रस्‍ताव मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्‍वयंअर्थसहाय्‍यित शाळा प्रस्‍ताव मागणी
स्‍वयंअर्थसहाय्‍यित शाळा प्रस्‍ताव मागणी

स्‍वयंअर्थसहाय्‍यित शाळा प्रस्‍ताव मागणी

sakal_logo
By

स्‍वयंअर्थसहाय्‍यित
शाळा प्रस्‍ताव मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १२ : स्वयंअर्थसहाय्‍यित तत्‍वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी पद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी पोर्टल तयार केले असून सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रकारच्या स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी शासनाकडून इरादापत्र मिळवण्यासाठी संबंधित संकेतस्‍थळावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या संकेतस्थळावर नियमित संस्थांना इरादापत्र मिळाल्यानंतर याच संकेतस्‍थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिनियमातील नियम ९ नुसार गठित केलेल्या विभागीय प्राधिकरणाद्वारे इच्छुक शैक्षणिक संस्थांकडून वरील संकेत स्‍थळावरच अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे पत्रक माध्यमिक शिक्षणचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95513 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..