निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

49756
बळवंत शिंदे
कोल्हापूर : टाकाळा येथील बळवंत गणपत शिंदे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

49758
जगदीश भोसले
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील जगदीश भोसले (वय ७६) यांचे निधन झाले. ते उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश (कै.) रावसाहेब भोसले यांचे कनिष्ठ चिरंजीव होत. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, रेसिडेन्सी क्लबचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

49759
निशा कंग्राळकर-देसाई
कोल्हापूर : उद्यमनगर येथील भारत बेकर्सच्या निशा संजीव कंग्राळकर-देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, नातू, जावई, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

03708
ललिता पाटील
कुंभोज : येथील ललिता बाबासाहेब पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ‘जवाहर’चे कर्मचारी प्रवीण पाटील यांच्या त्या आई होत.

02683
तुकाराम देसाई
कळे : येथील तुकाराम शामराव देसाई (वय ७०) यांचे निधन झाले. ग्रामपंचायत सदस्य अमर देसाई, वारणा दूध संघातील कर्मचारी विश्‍वास देसाई यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

49750
अमित काशीद
कोल्हापूर : उमा टॉकीज रविवार पेठ परिसरातील अमित उत्तमराव काशीद (वय ४४) यांचे निधन झाले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील न्यू भारत बेकरीचे ते मालक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहीण, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

49755
बायाक्का सुतार
बालिंगा : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील बायाक्का शंकर सुतार (वय ९८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १४) आहे.

03706
यादव कांबळे
कुंभोज : येथील माजी सैनिक यादव कृष्णा कांबळे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी राहुल कांबळे यांचे ते वडील होत.

49741
शोभाबेन शहा
गडहिंग्लज : येथील पाटणे गल्लीतील शोभाबेन चंद्रकांत शहा-इंचनाळकर (वय ८६) यांचे निधन झाले. शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक प्रदीप शहा यांच्या त्या आई होत.

49728
आनंदीबाई सुरुतकर
कोवाड : माणगाव (ता. चंदगड) येथील आनंदीबाई आप्पासो सुरुतकर (वय ७९) यांचे निधन झाले. दौलत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. आप्पासो सुरुतकर यांच्या त्या पत्नी, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सुरुतकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी मंगळवारी (ता. १३) सकाळी होणार आहे.

49351
विनय कुलकर्णी
इचलकरंजी ः सांगली येथील विनय माधव कुलकर्णी (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. येथील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

४९३११
रमेश कांबळे
रुकडी : हालोंडी (ता. हातकणंगले) येथील रमेश दादू कांबळे (वय ६०) यांचे निधन झाले.

१६७०
चित्राबाई सुतार
हळदी ः वाशी (ता. करवीर) येथील चित्राबाई शंकर सुतार (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

१७८६
पतंगराव भोसले
बोरपाडळे : येथील माजी सैनिक पतंगराव बाबूराव भोसले (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, मुलगी, भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १३) आहे.

२३५६
आनंदराव बल्लाळ
सिद्धनेर्ली : एकोंडी (ता. कागल) आनंदराव चंद्राप्पा बल्लाळ (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, चार मुली, जावई, पुतणे व नातवंडे असा परिवार आहे.


४९५२४
मिलिंद जगजंपी
कोल्हापूर : प्रसिद्ध कारखानदार आणि बळवंत नगर येथील मिलिंद सदाशिव जगजंपी यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

०१८२५
आनंदी खोत
शिरोली दुमाला : येथील आनंदी बाबूराव खोत (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

०१८२३
राजेंद्र पाटील यांचे निधन
कोल्हापूर, ता. १२ : शनिवार पेठ येथील राजेंद्र वसंतराव पाटील (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते सहकार विभागात लेखापरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी मरणोत्तर अवयवदान केले. रक्षाविसर्जन बुधवार (ता. १४) आहे.

४९५३७
मंगला कुलकर्णी
कोल्हापूर : सन्मित्र हौसिंग सोसायटी, काटकर माळ, राजारामपुरी येथील मंगला पांडुरंग कुलकर्णी (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

४९५४१
कमल बंड
कोल्हापूर : गारगोटी, कलानगर येथील कमल सुदाम बंड (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

४९५५२
सुरेश दळवी
कोल्हापूर : शनिवारी पेठ येथील सुरेश परशराम दळवी (वय ६५) यांचे निधन झाले. खोल खंडोबा तालीम मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते.

४९५५७
राजाराम कोठावळे
कोल्हापूर : पापाची तिकटी, लक्ष्मी गल्ली येथील बाळासाहेब ऊर्फ राजाराम महादेव कोठावळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

४९२९५
विजय ढवळे
कोल्हापूर : बागल चौक येथील विजय शंकरराव ढवळे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

४९३०१
इंदूबाई माळी
कोल्हापूर : कसबा बावडा, यशवंत कॉलनी येथील श्रीमती इंदूबाई आनंदराव माळी (वय ७२) यांचे निधन झाले.

४९३०७
शोभा मानकर
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील सौ. शोभा मोहन मानकर (वय ६२) यांचे निधन झाले.

४९३१०
अर्जुन बाकळे
कोल्हापूर : विक्रमनगर पहिली गल्ली येथील अर्जुन केशवराव बाकळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, पत्नी, सुना, भाऊ, आई असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95528 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..