सरोद मैफल बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरोद मैफल बातमी
सरोद मैफल बातमी

सरोद मैफल बातमी

sakal_logo
By

४९७६२


वरुणधारांसह ‘सरोद’चा स्वराभिषेक
सांगीतिक मेजवानी; ‘महालक्ष्मी ॲप्रल्स’ची संगीतसंध्या ठरली पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात सरोदवादक अमान अली बंगश यांच्या सुरेख वादनाने आज कोल्हापूरकरांची संगीतसंध्या रंगली. कोसळणाऱ्या वरुणधारांच्या साथीला सरोदचा स्वराभिषेक रसिकांनी अनुभवला. ‘महालक्ष्मी अॅप्रल्स’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केशवराव भोसले नाट्यगृहात मैफल झाली. ‘जॉय ऑफ आमन’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. तीन वर्षांच्या खंडानंतर कोल्हापूरकरांनी ही सांगीतिक मेजवानी अनुभवली.
महालक्ष्मी ॲप्रल्सतर्फे एक दशकापासून संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. महापूर आणि कोरोनामुळे तीन वर्षे ही संगीत मैफल झाली नव्हती. आज ही पर्वणी सर्वांनी अनुभवली. रवींद्र ओबेरॉय यांनी प्रास्ताविक केले.
ते म्हणाले, ‘‘शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आम्ही गेल्या दहा वर्षांपासून संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. माझ्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू केला. आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी कला सादर केली आहे.’’
शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. सरोद हे मूळचे अफगाणिस्तानातील वाद्यप्रकार आहे. अमजद अली खान यांनी त्यामध्ये बदल करून सतारसारखे सरोद बनवले. अमान हे त्याचे सुपुत्र आहेत. अमान यांना प्रसिद्ध तबलावादक ओजस आढिया यांनी साथसंगत केली. मैफलीची सुरवात आमन यांनी ‘रागेश्री’ या रागाने केली. अमान यांनी विविध रागातील बंदिशी या वेळी सादर केल्या. ‘तिलकमोद’, ‘मालकंस’, ‘खमाज’, ‘भटीयाळी’ या रागांमधील विविध बंदिशी त्यांनी वाजवल्या. देवी रागातील ‘सरस्वती’, ‘हंसदनी’ आणि ‘देस’ या आपल्या वडिलांच्या बंदिशी सादर करून त्यांनी रसिकश्रोत्यांना श्रवणीय अनुभूती दिली. ओजस यांच्या तबल्याच्या विलक्षण वादनाने सरोदाचा स्वर अधिक मधुर झाला. एकाच रागात तालाचे केलेले वेगवेळे प्रयोग, बंदिशी याला श्रोत्यांनी मनापासून दाद दिली. खमाजच्या वादनाने त्यांनी मैफलीचा समारोप केला.
यशोधरा ओबेरॉय, आशिष ओबेरॉय, रश्मी ओबेरॉय, प्रसिद्ध बासरीवादक सचिन जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95548 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..