वस्त्रोद्योगप्रश्नी आज मंत्रालयात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वस्त्रोद्योगप्रश्नी आज मंत्रालयात बैठक
वस्त्रोद्योगप्रश्नी आज मंत्रालयात बैठक

वस्त्रोद्योगप्रश्नी आज मंत्रालयात बैठक

sakal_logo
By

वस्त्रोद्योगप्रश्‍नी आज मंत्रालयात बैठक
विविध प्रलंबित प्रश्‍न; वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
इचलकरंजी, ता. १३ ः यंत्रमाग आणि सूतगिरण्यांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर मंत्रालयात बुधवारी (ता. १४) दुपारी ३ वाजता वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आवश्यक टिपणी सादर करण्याबाबतचे आदेश वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित यंत्रमाग व सूतगिरण्यांच्या प्रश्‍नांवर ठोस निर्णय होणार काय, याकडे लक्ष आहे.
वीजदरातील अस्थिरता, सूतदरातील तेजी-मंदी यामुळे तर यंत्रमाग उद्योजक हैराण आहेत. वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या सहकारी सूतगिरण्यांसमोरही कापूस दरातील चढ-उताराचा प्रश्‍न भेडसावत आहे. त्यामुळे एकूणच वस्त्रोद्योगात प्रचंड अस्वस्थता आहे. कापूस टंचाईमुळे अनेक सूतगिरण्या बंद ठेवाव्या लागत आहेत. नुकसान टाळण्यासाठी आठवड्यातून २४ तास ‘एअरजेट अॅटोलूम’ कारखाने बंद ठेवत आहेत.
कापडाला मागणी व दर नाही. त्यामुळे यंत्रमाग उद्योग मंदीचा सामना करीत आहेत. वीजदरातील अस्थिरतेमुळे उद्योजक हैराण आहेत. सूतदरातील तेजी-मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. व्याजदरातील अनुदानाचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. केंद्र आणि राज्य शासनाकडून या उद्योगाला ठोस मदत जाहीर झालेली नाही. बूस्टर डोस मिळाल्याशिवाय हा उद्योग उभारी घेऊ शकत नाही, अशी सद्यःस्थिती आहे. सातत्याने यंत्रमागधारक संघटनांकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप शासन पातळीवरून अपेक्षित दिलासा मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारमधील वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी यंत्रमाग आणि सूतगिरण्यांच्या प्रश्‍नांवर बुधवारी (ता. १४) बैठक आयोजित केली आहे. याबाबतचे पत्र कार्यासन अधिकारी प्रसेनजित कारलेकर यांनी नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तांना दिले आहे. याबाबतचे पत्र वस्त्रोद्योग, ऊर्जा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव, वस्त्रोद्योग महासंघाच्या अध्यक्षांनाही दिले आहेत.

कोट
यंत्रमाग व्यवसाय टिकण्यासाठी प्रथम कापूस व सूतदरात स्थैर्य आणले पाहिजे. त्यासाठी शासन पातळीवर ठोस धोरण ठरवावे लागणार आहे. याशिवाय उत्पादित कापडाला बाजारपेठ उपलब्ध देण्यासाठी सरकारने धोरणात योग्य ते बदल केले पाहिजेत.
- विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95568 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..